19 May 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Yes Bank Share | येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी, त्या बातमीनंतर शेअर अनस्टॉपेबल! पुढे शेअरचं काय होणार पहा

Yes Bank Share price

Yes Bank Share | शेअर बाजारात सरकारी बँकांचे शेअर्स मागील 5 महिन्यांपासून जबरदस्त कामगिरी करत आहेत, मात्र Yes Bank या खासगी बँकेने सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या Yes Bank च्या शेअर्समध्ये मंगळवारकच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज सुरुवातीच्या काही तासात Yes Bank चे शेअर 22 रुपयांच्या किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनमध्ये Yes Bank शेअर 23.60 रुपयांवर पोहचला होता. मागील 3 दिवसात जबरदस्त तेजीमुळे Yes Bank शेअर्स टॉप-100 सर्वात मूल्यवान सूचीबद्ध कंपन्यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. BSE इंडेक्स डेटानुसार, येस बँकेचे बाजार भांडवल 57,380 कोटी रुपयेवर गेले आहे. येस बँक सध्या खाजगी बँकेच्या मार्केट कॅप रँकिंगमध्ये 92 व्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी येस बँक बँकिंग सेवा क्षेत्रातील क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर आहे.

Yes Bank शेअरची वाटचाल :
कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये येस बँकेचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. काल दुपारपर्यंत स्टॉक 12 टक्क्यांच्या वाढीसह 23.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. खाजगी क्षेत्रातील Yes Bank च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 23.60 रुपये आहे. दुसरीकडे जर तुम्ही Yes बँकेचे मागील 3 ट्रेडिंग सेशनमधील चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, शेअर्सच्या किमतीत 35 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. 8 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 17.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांनी आतापर्यंत 27.78 टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे. Yes बँकेचे शेअर्स फॉलो करणाऱ्या तज्ज्ञांना विश्वास आहे की Yes Bank शेअर्स पुढील काळात 24 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

शेअर किंमत वाढीचे कारण :
CA Basque Investments आणि Verventa Holdings च्या Yes बँकेतील प्रस्तावित गुंतवणुकीला RBI तर्फे सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. RBI ने हा निर्णय नुकताच जाहीर केला होता, आणि ही बातमी समोर येताच येस बँकेच्या शेअर्सनी कमालीची तेजी पकडली, आणि स्टॉकमध्ये नॉनस्टॉप वाढ पाहायला मिळत आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 12.11 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Yes Bank Share price has increasing after receiving approval of Investment from CA Basque Investments and Verventa Holdings on 14 December 2022.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x