
Tata Group Share | सध्या जर तुम्ही टाटा उद्योग समूहातील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवले पाहिजे. पुढील काळात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स जबरदस्त रिटर्न्स कमावून देऊ शकतात. 2022 या वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये कमालीचा सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला होता, आता स्टॉक त्या दबावातून रिकव्हर होताना दिसत आहेत. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सनी 2022 या पूर्ण वर्षात शून्य टक्के परतावा दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 218.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
दोन वर्षांत 2005 टक्के मल्टीबॅगर रिटर्न :
13 डिसेंबर 2021 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 230 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, पण आता हे शेअर्स 219 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉक कठीण टप्प्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. 2022 मध्ये देखील स्टॉकमध्ये कन्सोलीडेशन पाहायला मिळाले आहे. तथापि मागील तीन वर्षांत टाटा पॉवर स्टॉकने कमालीची वाढ नोंदवली आहे. डिसेंबर 2019 पासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये 305 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत बीएसई निर्देशांकावर टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 72.8 रुपये किमतीवरून 200 टक्के मजबूत झाला आहे. टाटा पॉवर कंपनीच्या EBITDA मार्जिन 1.2 टक्के नोंदवला गेला आहे. हा मार्जिन दर स्टॉकमध्ये उच्च अस्थिरता दर्शवतो. टाटा पॉवर स्टॉक सध्या 5 दिवस , 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीवर ट्रेडिंग करत आहे, परंतु स्टॉक अजूनही 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीचा उद्योग PE 27.43 टक्के आहे.
गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा :
टाटा पॉवर या ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 218 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मागील तीन वर्षांत 328 टक्के परतावा मिळाला होता. तथापि टाटा पॉवर कंपनीच्या शेअरवर 2022 मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता, त्यानंतर स्टॉकमध्ये थोडी तेजी आली होती, मात्र तेजी जास्त काळ टिकू शकली नाही. सतत च्या धडपडीमुळे टाटा पॉवरचा मल्टीबॅगर टॅग काढून टाकण्यात आला आहे. टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये 2022 यावर्षात फक्त 3.67 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी स्पर्धक कंपनी जसे की, अदानी पॉवरच्या शेअरने 2022 या वर्षात 228 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. टाटा पॉवर कंपनीचा स्टॉक सध्या 5 दिवस , 20 दिवस , 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीवर परंतु 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीचा PE 27.43 आहे.
टाटा पॉवर कंपनीची तिमाही कामगिरी : सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर BSE निर्देशांकावर 219 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर टाटा पॉवर स्टॉक फुल एनर्जी मध्ये ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीचे बाजार भांडवल 69,850 कोटी रुपये आहे. 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 85 टक्क्यांची वाढ झाली होती. कंपनीने 935.18 कोटी रुपये महसूल संकलित केला होता तर 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 505.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
टाटा पॉवरवर तज्ञांचे मत : शेअर मार्केट तज्ञांना विश्वास आहे की, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स दीर्घ काळ होल्ड केल्यास चमत्कारिक परतावा देऊ शकतात. सध्या हा शेअर निश्चितपणे विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे, पण दीर्घ मुदतीत स्टॉकमध्ये 350-400 रुपयांपर्यंत जाण्याची क्षमता आहे. Tips2trade फर्ममधील तज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक दीर्घ काळात 395 रुपये किंमत स्पर्श करेल. जर स्टॉकने 190 रुपयेची सपोर्ट लेव्हल ब्रेक केली तर स्टॉकसाठी खूप वाईट काळ सुरू होऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.