19 May 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Penny Stock | स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज बडा धमाका! 38 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा, खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stock | शेअर बाजारातून दर वेळी नफा होईलच याची शाश्वती नाही. स्टॉकमधून पैसे कमविणे वाटते तेवढे सोपे काम नाही. तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, त्या कंपनीबद्दल तुम्हाला उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हाला त्या कंपनीच्या बिझनेस मॉडेल विषयी पूर्ण माहिती पाहिजे. जेणेकरून तुम्ही त्या स्टॉकमध्ये पैसे लावू शकता, आणि चांगला परतावा मिळेल याची अपेक्षा करू शकता. दुसरे म्हणजे, चांगल्या स्टॉकमध्ये दीर्घ काळ गुंतवणूक केली तर जबरदस्त परतावा मिळेल हे नक्की. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अल्प गुंतवणुकीवर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचना 1 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, L G Balakrishnan & Bros Share Price | L G Balakrishnan & Bros Stock Price | BSE 500250 | NSE LGBBROSLTD)

एलजी बालकृष्णन अँड ब्रदर्स :
आपण या लेखात एलजी बालकृष्णन अँड ब्रदर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत. एलजी बालकृष्णन कंपनीचा शेअर मागील 22 वर्षांपासून अप्रतिम परतावा कमावून देणारा स्टॉक ठरला आहे. 12 एप्रिल 2001 रोजी NSE निर्देशांकावर या कंपनीचा शेअर 2.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यात सातत्याने वाढ होऊन स्टॉक सध्या 700 रुपयांवर पोहचला आहे. या कंपनीच्या स्टॉकने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना 26019.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 261 पट अधिक वाढले आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये फक्त 38461 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1 कोटी रुपये झाले आहे.

5 वर्षात दिलेला परतावा :
15 डिसेंबर 2017 रोजी एलजी बालकृष्णन अँड ब्रदर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 461.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 700 रुपयांवर पोहचला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 51.70 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे मागील 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दीड पट अधिक वाढले आहेत. याचा अर्थ असा की ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 3 लाखांपेक्षा अधिक झाले आहे.

सुरुवातीपासून आतपर्यंत परतावा :
5 जानेवारी 1996 रोजी एलजी बालकृष्णन अँड ब्रदर्स कंपनीचे शेअर्स 30.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर या स्टॉक मध्ये इतकी वाढ झाली की, स्टॉक सध्या 700 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 2,179.39 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या लोकांनी 1996 मध्ये या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 22 पट अधिक वाढले आहे. याचा अर्थ असा की, ज्या लोकांनी त्यावेळच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 22 लाखांच्या पुढे गेले आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 25 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे.

कंपनीचा उद्योग प्रोफाइल थोडक्यात :
1937 साली LGB कंपनीची स्थापना परिवहन ऑपरेटर म्हणून झाली होती. कंपनी मागील 84 वर्षांपासून या उद्योग क्षेत्रात काम करत आहे. LGB कंपनीचे पूर्ण भारतात 19 अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प कार्यरत आहे. कंपनीचा एक प्लांट मुंबईत देखील आहे. LGB कंपनी 1.5 दशलक्ष चौरस फुटांहून अधिक बिल्ट-अप क्षेत्रासह अत्याधुनिक उत्पादन सुविधा, एलजीबी ऑटोमोटिव्ह टायमिंग आणि ट्रान्समिशन उत्पादनांमध्ये भारतातील अग्रेसर कंपनी पैकी एक आहे. कंपनी मुख्यतः ड्राईव्ह चेन, स्प्रॉकेट्स, ऑटो टेन्शनर्स, मार्गदर्शक, फाइन ब्लँक्ड घटक, अचूक मशीन केलेले भाग, बेल्ट, रबर उत्पादने यांचे उत्पादन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of LG Balakrishnan Share Limited company share price return on investment on 14 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x