19 May 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Stock To Buy | तब्बल 70% स्वस्त झालेला हा प्रसिद्ध शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टॉप ब्रोकरेजने दिलेलं कारण काय?

Stock to Buy

Stock To Buy | शुक्रवारी आठवड्याचा शेवटचा दिवस होता. आणि शुक्रवारी विकली एक्सपायरी देखील होती. शेअर बाजारात सध्या कोरोना मुळे नकारात्मक भावना पसरल्या आहेत, म्हणून काल शेअर बाजार कोसळला. अशा वेळी पीबी फिनटेक कंपनीच्या शेअर्सवर प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. न्यू एज टेक कंपनीच्या स्टॉकमध्ये 2022 या वर्षात 53 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. सध्या शेअर बाजारात जी पडझड पाहायला मिळत आहे, गुंतवणूक तज्ज्ञ याला खरेदीची सुवर्ण संधी मानत आहेत. गुंतवणूक तज्ञांनी पडत्या मार्केट मध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. शुक्रवारी (23 December) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 436.85 रुपये या आपल्या नवीन नीचांक किंमत पातळीवर पोहोचले. अर्थातच यामुळे शेअर धारकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)

शेअरची लक्ष किंमत :
भारतातील प्रसिद्ध गुंतवणूक आणि संशोधन कंपनी एडलवाईसने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ऑनलाइन वित्तीय उत्पादन क्षेत्र पुढील काळात चांगली प्रगती करेल, आणि याचा फायदा PB Fintech सारख्या कंपनीला होईल. ऑनलाईन वित्तीय क्षेत्रातील वाढीचा सकारात्मक परिणाम पोलिसी बाजार सारख्या कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळेल. पोलिसी बाजार कंपनीची पर्यायी चॅनेल अपॉइंटमेंट्स आणि POSP मध्ये गुंतवणूक करण्याची रणनीती, केवळ स्टॉक व्हॉल्यूममध्ये वाढ करत नाही तर तिची ट्रेडिंगची शक्ती देखील वाढवते. PB स्टॉक अलीकडील सुधारणानंतर FY23/ FY24E/ 7.2x/ 5.7x विक्रीवर ट्रेड असल्याची माहिती ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात दिली आहे. पुढील काळात PB कंपनीचे शेअर्स 550 रुपये पर्यंत वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊसने पॉलिसी बाझार कंपनीच्या शेअर्सवर ‘ बाय ‘ रेटिंग देऊन स्टॉक 550 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. PB Fintech कंपनीच्या व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की कंपनीच्या महसुलात 85 टक्के पेक्षा जास्त जास्त वाढ होईल आणि अपॉइंटमेंट चॅनल देखील NPV पॉझिटिव्ह राहील.

मागील वर्षी आयपीओ लिस्ट झाला होता :
पॉलिसी बाझार कंपनीच्या शेअर्सने मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात शानदार एंट्री केली होती. या कंपनीचे शेअर नोव्हेंबर 2021 पासून खाली पडत आहेत, आणि स्टॉक सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 70 टक्के पडला आहे. 17 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 1470 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते, ते साध्य 436.85 रुपयांवर आले आहेत. 2022 मध्ये PB स्टॉकमध्ये 53 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. पॉलिसी बाजार कंपनीचा शेअर 1,150 रुपये या आपल्या लिस्टिंग किंमतीच्या तुलनेत 62 टक्क्यांनी खाली पडला आहे. 15 नोव्हेंबर 2021 रोजी PB Fintech कंपनीचे शेअर्स 980 रुपये या आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 17 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock To Buy call on PolicyBazaar Share price recommended check details on 24 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x