
Bank FD Vs Sarkari Bank Shares | मागील काही महिन्यात सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये सरकारी बँकाच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला होता. मात्र आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली असून गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक सोबत युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेच्या शेअर धारकांनी ही जबरदस्त कमाई केली आहे.
शेअर्समध्ये एका दिवसात 20 टक्के वाढ :
इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.81 टक्के वाढीसह 31.45 रुपयांवर क्लोज झाले होते. आज या सरकारी बँकेचे शेअर्स 5.77 टक्के वाढीसाठी 33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये 87 टक्के वाढ झाली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स 27 जून 2022 रोजी 16.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
युनियन बँकेचे शेअर्स 18 टक्के वाढले :
युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने फक्त एका दिवसात 18 टक्क्यांची उसळी घेतली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये UBI चा स्टॉक 18.86 टक्क्यांच्या वाढीसह 80.35 रुपयांवर क्लोज झाला होता. आज हा स्टॉक 3.61 टक्के वाढीसह 83.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या सरकारी बँकेच्या शेअर्सची किंमत 130 टक्के वाढली आहे. 27 जून 2022 रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स BSE इंडेक्सवर 34.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आज हा स्टॉक 83.15 रुपयेवर पोहचला आहे. 26 डिसेंबर 2022 रोजी UBI चे शेअर्स 80.35 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 1 वर्षात UBI च्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे.
इतर सरकारी बँकांच्या शेअर्समधील वाढ :
पंजाब नॅशनल बँक, युको बँक, सेंट्रल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. या स्टॉक नी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आज पंजाब नॅशनल बँकेचा शेअर 1.31 टक्क्यांच्या वाढीसह 54.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. त्याच आज वेळी युको बँकेचे शेअर्स 2.19 टक्क्याच्या वाढीसह 32.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तर आज सेंट्रल बँकेचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 32.35 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.