21 May 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Bikaji Foods International Share Price | 5 दिवसांत या शेअरने 21% परतावा दिला, सलग 4 दिवस अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीसाठी झुंबड का?

Bikaji Foods International Share Price

Bikaji Foods International Share Price | मागील चार दिवसांपासून बिकाजी फुडस कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत ट्रेड करत आहेत. या तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना होत आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स 350.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र अवघ्या सहा दिवसांत शेअरची किंमत 425.55 रुपयांवर पोहोचली. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी 1.49 टक्के वाढीसह 432 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक 446. 50 रुपये किमतीवर ओपन झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods International Share Price | Bikaji Foods International Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)

सलग 4 दिवस अप्पर सर्किट
सलग चार दिवस शेअरने अप्पर सर्किटला धडक दिली होती, मात्र सध्या हा स्टॉक 1.87 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात बिकाजी फूड्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 434.65 रुपयांवरून 350.15 रुपयांपर्यंत खाली आली आहे. यानंतर स्टॉकमध्ये पुन्हा तेजी आली आणि शेअर सध्या हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 21 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत बिकाजी फूड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे.

16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निर्देशांकावर लिस्ट झाले होते. BSE इंडेक्सवर बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स 7.05 टक्क्यांच्या वाढीसह 321.15 रुपये प्रति शेअर या किमतीवर सूचीबद्ध झाले होते. बिकाजी फूडस ही कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी स्नॅक उत्पादक कंपनी आहे. बिकाजी फूडस कंपनीचे उत्पादने भारताशिवाय परदेशातही निर्यात केले जातात. उद्योग वाढीच्या दृष्टीने भारतीय स्नॅक्स मार्केटमध्ये बिकाजी फूडस ही दुसरी सर्वात वेगाने वाढणारी कंपनी मानली जाते.

स्टॉक खरेदी करावा? विकावा की होल्ड करावा? :
शेअर बाजारातील तज्ञांनी बीकाजी फूड कंपनीच्या शेअर्सवर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स दिर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून देतील असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bikaji Foods International Share Price in Focus on return check details on 30 December 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x