10 May 2024 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

PSP Projects Share Price | हा शेअर 42% वाढला, आता हा स्टॉक 3 महिन्यांत उत्तम परतावा देऊ शकतो, मोतीलाल ओसवालचा सल्ला

PSP Projects Share Price

PSP Projects Share Price | 2022 या वर्षात गुंतवणूकदारांनी काही खास कमाई केली नाही, कारण शेअर बाजारात खूप अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण होते. जर तुम्हाला 2023 या नवीन वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ कमाई करायची असेल तर तुम्ही PSP प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने PSP प्रोजेक्ट्स कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील एक ते तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमवून देऊ शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PSP Projects Share Price | PSP Projects Stock Price | BSE 540544 | NSE PSPPROJECT)

पीएसपी प्रोजेक्ट कंपनीचे ऑर्डर बुक – मोतीलाल ओसवाल
मोतीलाल ओसवाल या फर्मने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, पीएसपी प्रोजेक्ट कंपनीचे ऑर्डर बुक सध्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचले आहे. सध्या या ऑर्डर बुकचा आकार 5100 कोटी रुपये आहे. या ऑर्डर बुकमध्ये मुखतः निवासी प्रकल्प, संस्थात्मक आणि सरकारी पायाभूत प्रकल्प, खाजगी निवासी प्रकल्प याचा समावेश आहे. भारत सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे पीएसपी प्रोजेक्टसारख्या कंपन्यांना रिअल इस्टेट क्षेत्रातील सुधारणा आणि बांधकाम क्षेत्रात निर्माण होणाऱ्या उदयोन्मुख संधींचा भरघोस फायदा मिळवता येईल. ब्रोकरेज हाऊसला विश्वास आहे की, पीएसपी प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीपासून तेजीत येऊ शकतात. ब्रोकरेज हाऊसने गुंतवणुकदारांना 616 रुपयांच्या स्टॉप लॉससह 825 रुपये या लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉक ही किंमत 1 ते 3 महिन्यांत स्पर्श करेल. सध्याच्या किमतीवर पैसे लावल्यास अल्पावधीत 20 टक्के परतावा मिळू शकतो, असे तज्ञांना वाटते.

स्टॉक 42 टक्के वाढला
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये PSP प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 689.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरमधे 2.50 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 25 टक्के वाढला आहे. 2022 या वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी हा स्टॉक 42 टक्के वाढला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PSP Projects Share Price in focus 540544 PSPPROJECT check details on 31 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x