
SBI Mutual Fund | स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या गुंतवणूकदारांसाठी अनेक गुंतवणूक योजना राबवते. 2022 या वर्षात SBI बँक स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. इतर लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत एसबीआय बँकच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
SBI म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. या वर्षी SBI स्टॉकप्रमाणे SBI म्युच्युअल फंडाने ही चांगले रिटर्न्स दिले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 SBI म्युचुअल फंड योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. (Get latest net asset value (NAV) for all SBI Mutual Fund schemes. Track your mutual fund NAV online with ease)
SBI PSU फंड :
SBI PSU म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमवून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत एसबीआय पीएसयू म्युचुअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच AUM 535 कोटी रुपये होते. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.45 टक्के आहे. या म्युचुअल फंडात तुम्ही किमान 5,000 रुपये जमा करून प्रारंभिक गुंतवणूक सुरू करु शकता. तर SIP मध्ये 500 रुपये लावून तुखी गुंतवणूक सुरू करु शकता.
एसबीआय निफ्टी बँक ईटीएफ :
एसबीआय निफ्टी बँक ईटीएफने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल योजनेचा AUM 4793 कोटी रुपये आहे. त्याच वेळी या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.20 टक्के आहे. तुम्ही या योजनेत किमान 5,000 एकरकमी रक्कम लावून गुंतवणूक सुरू करु शकता.
एसबीआय निफ्टी प्रायव्हेट बँक ईटीएफ :
एसबीआय निफ्टी प्रायव्हेट बँक ईटीएफ म्युचुअल फंडने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाचे AUM 137 कोटी रुपये आहे. 31 मार्च 2022 रोजी या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.15 टक्के होते. या योजनेत तुम्ही किमान 5,000 रुपये जमा करून गुंतवणूक करू शकता.
SBI Consumption Mutual Fund :
या म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेचा AUM 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 1194 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.24 टक्के आहे. यात एकरकमी गुंतवणुक करण्यासाठी तुम्हाला किमान 5,000 रुपये जमा करावे लागेल. तर एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागेल.
SBI Banking and Financial Services Fund :
या म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंडाचे AUM प्रमाण 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 3984 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. तर या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.80 टक्के आहे. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 5,000 रुपये आहे. तर एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 500 रुपये आहे.
SBI म्युच्युअल फंड हाऊस अनेक नवीन योजना बाजारात लाँच करते. नुकताच SBI म्युच्युअल फंडाने ‘SBI लाँग ड्युरेशन फंड’ लाँच केला आहे. ही नवीन फंड ऑफर 12 डिसेंबर 2022 रोजी पासून ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी ओपन करण्यात आली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.