4 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील आजचे सोनं-चांदीचे दर तपासा

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने तेजी दाखवली असताना चांदीचे दर मात्र घसरले आहेत. अशा वेळी सोन्याचा दर त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. चला जाणून घेऊयात गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात किती फरक पडला होता.

२४ कॅरेट सोन्याचा भाव
शुक्रवारी (०६ जानेवारी २०२३) सोन्याचा भाव 55587 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचबरोबर सोमवारी (२ जानेवारी २०२३) सोन्याचा भाव 55163 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. अशात संपूर्ण आठवड्यात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 424 रुपये वाढीसह बंद झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीत अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत.

चांदीची स्थिती काय
शुक्रवारी चांदीचा भाव 67888 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्याचबरोबर चांदीचा भाव सोमवारी 68349 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. अशात संपूर्ण आठवडाभरात चांदीचा भाव 461 रुपये प्रति किलोने कमी झाला आहे.

ऑल टाइम हायवरून किती खाली?
शुक्रवारी सोने आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा सुमारे 613 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या कमी दराने बंद झाले. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोनं 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेलं होतं. त्याचबरोबर चांदी शुक्रवारी 7,112 रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकाच्या खाली बंद झाली आहे. चांदीने एप्रिल २०११ मध्ये ७५,००० रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केला होता.

जाणून घ्या देशातील सर्व प्रमुख शहरांचे सोन्या-चांदीचे दर :

औरंगाबाद
22 कॅरेट सोनं : 51300 रुपये, 24 कॅरेट सोनं : 55960 रुपये, चांदी कीमत : 71800 रुपये

कोल्हापूर
22 कॅरेट सोनं : 51300 रुपये, 24 कॅरेट सोनं : 55960 रुपये, चांदी कीमत : 71800 रुपये

लातूर
22 कॅरेट सोनं : 51330 रुपये, 24 कॅरेट सोनं : 55990 रुपये, चांदी भाव : 71800 रुपये

मुंबई
22 कॅरेट सोनं : 51300 रुपये, 24 कॅरेट सोनं : 55960 रुपये, चांदी कीमत : 71800 रुपये

नागपूर
22 कॅरेट सोनं : 51300 रुपये, 24 कॅरेट सोनं : 55960 रुपये, चांदी कीमत : 71800 रुपये

नाशिक
22 कॅरेट सोनं : 51330 रुपये, 24 कॅरेट सोनं : 55990 रुपये, चांदी कीमत : 71800 रुपये

पुणे :
22 कॅरेट सोनं : 51300 रुपये, 24 कॅरेट सोनं : 55960 रुपये, चांदी कीमत : 71800 रुपये

वसई-विरार :
२२ कॅरेट सोनं : ५१३३० रुपये, २४ कॅरेट सोनं : ५५९९० रुपये, चांदीचा भाव : ७१८०० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates on 08 January 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x