4 May 2024 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम योजनांची लिस्ट सेव्ह करा, योजनेचे नवीन व्याजदर आणि फायदे लक्षात घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme | जर तुम्ही इंडिया पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या खूप फायद्याचा आहे. आज या लेखात आपण इंडिया पोस्ट ऑफिस द्वारे राबवल्या जाणाऱ्या टॉप पाच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या सर्व योजनांवर चांगले व्याज परतावा देते. पोस्ट ऑफिसच्या या 5 योजनाचे व्याजदर सरकारने नुकताच अपग्रेड केले आहेत. 1 जानेवारी 2023 पासून इंडिया पोस्ट ऑफिसने आपल्या सर्व योजनांवर दिला जाणारा व्याजदर वाढवला आहे. आतापासून पोस्ट ऑफीसमधे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. हे नवीन व्याजदर 31 मार्च 2023 पर्यंत लागू राहतील आणि त्यानंतर भारत सरकार पुन्हा एकदा या व्याजदराने पुनर्विलोकन करेल.

पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजना :

मासिक उत्पन्न योजना : भारत सरकारने ‘पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम’ योजनेचा व्याज दर 6.7 टक्के वरून वाढवून 7.1 टक्के केला आहे. या योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये जमा करणे आवश्यक आहेत. या योजने अंतर्गत संयुक्त खात्यात कमाल शिल्लक 9 लाख रुपये, तर एकल खात्यात कमाल शिल्लक 4.5 लाख रुपये जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. खाते उघडल्यापासून ते मुदतपूर्तीपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटी व्याज परतावा दिला जातो. ही पोस्ट ऑफिसची अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकरकमी ठेवीवर दरमहा हमी परतावा मिळेल. या योजनेत गुंतवलेले सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यावर बाजारातील चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम : पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी चार कार्यकाळ पर्याय देण्यात आले आहेत. एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षे. या योजनेत कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र योजना खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये जमा करावे लागेल. 1 जानेवारी 2023 पासून भारत सरकारने या योजनेत वाढीव व्याज परतावा देण्याची घोषणा केली आहे.

POTDS योजनेत मिळणारा परतावा :
1) या योजनेत गुंतवणूकदाराला 1 वर्षाच्या ठेवीवर 6.6 टक्के व्याज परतावा दिला जाईल, जो पूर्वी 5.5 टक्के होता.
2) दोन वर्षांच्या ठेवींवर 5.7 टक्के व्याज परतावा दिला होता, त्यात वाढ करून आता 6.8 टक्के व्याज परतावा मिळेल.
3) तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर पूर्वी 5.8 टक्के व्याज परतावा दिला जात होता, मात्र आता 6.9 टक्के व्याज परतावा दिला जाईल.
4) 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर पूर्वी 6.7 टक्के व्याज परतावा मिळत होता, मात्र आता 7 टक्के व्याज परतावा दिला जाईल.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट :
भारत सरकारने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेवर मिळणारा व्याजदर जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये 6.8 टक्के वरून वाढवून 7 टक्के केला आहे. NSC योजनेतील गुंतवणूकदार गरजेच्या वेळी कर्ज हवे असल्यास आपली गुंतवणूक बँकेकडे तारण ठेवून कर्ज मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला जास्त काळ पैसे करण्याची गरज नाही. योजनेचा मुदतपूर्ती कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना :
भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 1 जानेवारी 2023 पासून वाढून 8.0 टक्के केला आहे. पूर्वी योजनेत 7.6 टक्के व्याज परतावा दिला जात होता. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करून लाभ घेऊ शकते. तसेच ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे परंतु 60 वर्षांपेक्षा कमी आहे, आणि ते निवृत्त व्यक्ती आहेत अशा लोकांनाही याण्योंनेचा फायदा घेता येतो. या योजनेतील किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम 1000 रुपये आहे, तर कमाल गुंतवणूक मर्यादा रक्कम 15 लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमच्या खात्यावर दर तीन महिन्यांनी व्याज परतावा जमा केला जाईल. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला असून योजनेचा कालवड आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो.

किसान विकास पत्र :
भारत सरकारने किसान विकास पत्र योजनेवरील व्याजदर 1 जानेवारी 2023 पासून वाढवले आहे. व्याजदर 7.0 टक्के वरून 7.2 टक्के करण्यात आले आहे. या योजनेतील व्याजदरानुसार तुमची गुंतवणूक रक्कम दर 120 महिन्यांत दुप्पट होते. व्याज परतावाची रक्कम दर वर्षाच्या शेवटी तुमच्या योजना खात्यात जमा केली जाईल आणि त्यावरही चक्रवाढ व्याज पद्धतीनुसार व्याज परतावा मिळेल. KVP योजनेत गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा रक्कम 1000 रुपये आहे. तर या योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा निश्चित नाही. यासोबतच या योजनेत तुम्ही एका व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून नोंदवू शकता. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही आयकर भरावा लागत नाही, कारण त्याच्या व्याजावर दरवर्षी कर आधीच कापला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Scheme for good return in long term check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

Post office Scheme(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x