
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांची कंपनी ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ चे शेअर्स मागील दोन दिवसांपासून ट्रेड करत नाही. कंपनीच्या शेअर्सनी 2023 या वर्षाची सुरुवात तेजीत केली होती. 2023 हे नवीन वर्ष सुरू झाल्यावर अवघ्या 7 ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 33 टक्के वाढली होती. मात्र, आता रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग मागील चार दिवसांपासून बंद करण्यात आली आहेत. ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. कारण कंपनीने 40,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, जे कंपनी परत फेडू शकत नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
दिवाळखोर कंपनीच्या शेअरची वाटचाल :
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 5 वर्षात 98 टक्के पडली आहे. एकेकाळी या कंपनीच्या शेअरची किंमत 600 रुपये होती, मात्र शेअरची किंमत सध्या 11.15 रुपयेवर आली आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग 11.15 रुपये किमतीवर बंद करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 216 रुपयांवरून 11 रुपये वर आली आहे. म्हणजेच या कालावधीत शेअरची किंमत 95 टक्के कमी झाली आहे.
रिलायन्स कॅपिटलचा कायदेशीर पेच :
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने कंपनीचे कर्जदार आणि रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या प्रशासकाला टोरेंट इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या याचिकेवर 16 जानेवारी 2023 पर्यंत उत्तर देण्याची सूचना केली होती. टॉरेंट इन्व्हेस्टमेंट्स ग्रुपने दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनी खरेदी करण्यासाठी 8,640 कोटी रुपयांची बोली लावली होती.
टोरेंट इन्व्हेस्टमेंटने NCLT मध्ये याचिका दाखल का केली?
टोरेंट इन्व्हेस्टमेंट ग्रुपने NCLT मध्ये याचिका दाखल करून रिलायन्स कॅपिटल या दिवाळखोर कंपनीच्या बोलीदारांसाठी ‘चॅलेंज मेकॅनिझम’ किंवा ई-लिलावची दुसरी फेरी आयोजित करण्यासाठी कर्जदारांचे मतदान अधिकार स्थगित करण्याची मागणी याचिकेत केली आहे. टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स ग्रुपचे प्रतिनिधीत्व करणारे डॅरियस खंबाटा यांनी लिलाव प्रक्रिया अयोग्य होती असे म्हंटले आहे. आम्ही म्हणजेच टोरंट ग्रुपने 8,640 कोटी रुपयांची लावलेली बोली ‘चॅलेंज मेकॅनिझम’ चे पालन करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.