5 May 2024 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

PTC India Share Price | या 2 कंपन्यांची नाव अदानी-अंबानीशी जुळताच शेअर्स रॉकेट वेगात, तुम्ही फायदा घेणार? स्टॉक डिटेल

PTC India Share Price

PTC India Share Price | मागील बऱ्याच दिवसापासून स्टॉक मार्केटमध्ये दोन कंपन्यांचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. या दोन्ही कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम खरेदी पाहायला मिळत आहे. एका कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यापासून दररोज अप्पर सर्किट हिट करत आहेत. या दोन कंपन्यांचे नाव आहे, ‘लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड’ आणि ‘पीटीसी इंडिया’. लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यापासून दररोज अप्पर सर्किट हिट करत आहेत. सतत वरच्या वळणावर येत आहेत . त्याच वेळी पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स देखील तेजीत ट्रेड होत आहेत. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी ‘लोटस चॉकलेट’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के मजबुतीसह 281.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 164.58 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तर पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 3.25 टक्के वाढीसह 115.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)

पीटीसी इंडिया कंपनी शेअर
पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी उद्योग समूह या कंपनीतील भागभांडवल खरेदी करणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात पसरली आहे. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सने तुफानी तेजी पकडली आहे. एनटीपीसी, एनएचपीसी, पॉवर ग्रीड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीकडे पीटीसी इंडिया कंपनीत 4-4 टक्के भाग भांडवल गुंतवणूक आहे. या कंपन्या आपले शेअर्स अदानी उद्योग समूहाला विकू शकतात. तथापि पीटीसी इंडिया कंपनीने कंपनीच्या प्रवर्तकांकडून भाग भांडवलाच्या विक्रीच्या प्रश्नावर त्यांना कोणतीही माहिती नाही असे उत्तर दिले आहे. अदानी उद्योग समूहाने पीटीसी इंडिया कंपनीमधील शेअर्स अधिग्रहण केले तर अदानी उद्योग समूह ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा प्लेअर म्हणून समोर येईल. पीटीसी इंडिया कंपनीची स्थापना 1999 साली झाली होती.

लोटस चॉकलेट कंपनी शेअर्स
लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे मुकेश अंबानींनी लोटस चॉकलेट कंपनीचे भाग भांडवल खरेदी केले आहेत. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड यांनी लोटस चॉकलेट कंपनीमधील जास्तीचे 26 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर स्कीम जाहीर केली आहे. ही ओपन ऑफर 21 फेब्रुवारी 2023 ते 6 मार्च 2023 दरम्यान सुरू राहील. या ओपन ऑफरमध्ये रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनी किरकोळ गुंतवणूकदारांकडून 115.50 रुपये या बाजार भावाने स्टॉक खरेदी करतील. रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG क्षेत्रात झपाट्याने विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील काळात रिलायन्स इंडस्ट्रीज लोटस चॉकलेटच्या प्रमोटरकडून 113 रुपये प्रति शेअर या किमतीवर 51 टक्के भाग भांडवल खरेदी करेल. RCPL आणखी 26 टक्के शेअर्सचे अधिग्रहण करण्यासाठी ओपन ऑफर जाहीर करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PTC India Share Price 532524 Stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x