6 May 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

Drone acharya Aerial Innovations Share Price | 1 दिवसात या शेअरने 100% परतावा दिला, आता प्रॉफिट बुकींग, स्वस्तात खरेदी करावा?

Drone acharya Aerial Innovations Share Price

Drone Acharya Aerial Innovations Share Price | ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स गडगडत आहेत. शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 153.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकची किंमत 12.17 टक्के खाली आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

23 डिसेंबर 2022 रोजी ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग झाल्यावर शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतवा दिला होता. या ड्रोन स्टार्टअप कंपनीने स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा मिळवून दिला होता. तेव्हापासून शेअरमध्ये दररोज अपर सर्किट लागत होता, मात्र आता स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढत आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 54 रुपये निश्चित करण्यात आली होती.

नामवंतांनी ही गुंतवणूक केली आहे :
‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीमध्ये गुंतवणूक करून दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी 4.57 लाख शेअर्स खरेदी केले होते. बंपर स्टॉक लिस्टिंगनंतर त्यांच्या 2.45 कोटी रुपये गुंतवणुकीचे मूल्य अल्पावधीत दुप्पट झाले होते. प्री आयपीओ भांडवल उभारणीच्या टप्प्यात बॉलीवूड अभिनेता आमिर खानने याने ड्रोन आचार्य कंपनीचे 46,600 शेअर्स खरेदी करून 25 लाख रुपये गुंतवले होते. रणबीर कपूरने ही या कंपनीचे 37,200 शेअर्स खरेदी करून 20 लाख रुपये कंपनीमध्ये लावले आहेत. प्री आयपीओ गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 53.59 रुपये किमतीवर मिळाले होते. स्टॉक लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते.

पुणे शहरातून सुरू झालेल्या या ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हा आयपीओ ओव्हरसबस्क्राइब झाला होता. अवघ्या तीन दिवसांत या कंपनीचा आयपीओ 262 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 330 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ ही कंपनी DGCA कडून RPTO म्हणजेच ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ परवाना मिळवणारी भारतातील पहिली कंपनी आहे. मार्च 2022 पासून कंपनीने आतापर्यंत या कंपनीने 200 पेक्षा अधिक ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षित केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Innovations Share Price 543713 stock market live on 26 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x