
Nazara Technologies Share Price | शेअर बाजारात ‘बिल बुल’ या नावाने प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओ मधील ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये 6.5 टक्के वाढ पाहायला मिळाली. दरम्यान शेअर 651 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2022 या तिसऱ्या तिमाहीमध्ये नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 31 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)
डिसेंबर 2022 या तिमाहीमधे नजारा टेक्नॉलॉजी कंपनीने 22.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये कंपनीने 17.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला होता. प्रॉफिटेबल तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नजारा कंपनीने 314.80 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या या तिमाहीत कंपनीने 185.80 कोटी रुपये महसूल संकलित केला होता त्यानुसार या तिमाहीमध्ये महसुलात 70 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची वाटचाल :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर खरेदी केले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 14 टक्क्यांनी वाढले आहे. नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 1188 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 475.05 रुपये होती.
रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
ट्रेडलाइनच्या आकडेवारीनुसार दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे दहा टक्के भाग भांडवल होते. म्हणजेच त्यांच्याकडे कंपनीचे 65,88,620 शेअर्स होते. त्याचवेळी कंपनीच्या दोन्ही प्रमोटरकडे कंपनीचे एकूण 19.1 टक्के भाग भांडवल आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.