4 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

'मैं भी चौकीदार' या राजकीय मोहिमेत आमचा सहभाग नाही: बँक अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

India, Narendra Modi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. परंतु, देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’नं या संघटनेनं याबद्दल असमर्थतता दर्शवली आहे. यासाठी संघटनेनं थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलं आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका, असा पवित्रा संघटनेनं घेतला आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’नं या इंग्रजी दैनिकानं हे अधिकृत वृत्त दिलं आहे.

‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’नं (एआयबीओसी) पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात सरकारी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला आहे. यामध्ये बँकांचं विलिनीकरण, कर्मचारी भरती यांच्यासह अनेक प्रश्नांचा समावेश आहे. या पत्राची प्रत आर्थिक सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशनलाही (आयबीए) पाठवण्यात आली आहे. एआयबीओसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास 3 लाख 20 हजार अधिकारी (एकूण अधिकाऱ्यांच्या 85 टक्के) या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x