1 May 2025 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | म्युचुअल फंड क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. म्युचुअल फंडमध्ये क्षेत्र आधारित योजना देखील उपलब्ध आहेत, जसे की इन्फ्रा, फार्मा, बँकिंग आणि फायनान्शिअल. आज या लेखात आम्ही तुम्हाला पायाभूत क्षेत्रातील सर्वोत्तम म्युच्युअल फंड योजनेची माहिती देणार आहोत, जिने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आपण ज्या म्युच्युअल फंडाची चर्चा करत आहोत तिचे नाव आहे, ‘ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड. ही म्युचुअल फंड योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हाऊसची टॉप रेटेड सेक्टरल फंड स्कीम म्हणून ओळखली जाते. (ICICI Prudential Mutual Fund Scheme, ICICI Prudential Mutual Fund SIP – Direct Plan | ICICI Prudential Infrastructure Fund latest NAV today | ICICI Prudential Infrastructure Fund latest NAV and ratings)

योजनेला मिळाले सर्वोच्च रेटिंग : 
या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरीपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युच्युअल फंड योजना मागील एक वर्षात सर्वोत्तम परतावा देणारी एसआयपी योजना देखील आहे. तसेच या म्युच्युअल फंड योजनेला व्हॅल्यू रिसर्च फर्मने सर्वोच्च रेटिंग प्रदान केले आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
ज्या गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनेमध्ये 3 वर्षासाठी 10000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 6.40 लाख रुपये झाले आहे. 3 वर्षात एकूण 3.70 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आणि त्यावर सरासरी वार्षिक 38 टक्के परताव्यानुसार, गुंतवणूकीचे मूल्य 6.40 लाख रुपये झाले आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा मिळवून दिला आहे, याचा अर्थ असा नाही की यावर पुढील काळात असाच परतावा मिळत राहील. ही एक इक्विटी म्युचुअल फंड योजना आहे, ज्यावर मिळणारा परतावा शेअर बाजाराच्या स्थितीच्या अधीन असतो. गुंतवणूक तज्ञांद्वारे देखील शेअर बाजाराच्या परिस्थितीनुसार म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

गुंतवणुकीवर वार्षिक परतावा :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 22.31% परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या श्रेणीच्या 11 टक्के परताव्याच्या तुलनेत जास्त परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात सरासरी वार्षिक 36.78%, 3 वर्षात 25.39% आणि 5 वर्षात 12.83% वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. 1 वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांमध्ये श्रेणी सरासरी परताव्याच्या तुलनेत या म्युच्युअल फंड योजनेने जास्तच परतावा दिला आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 13.47 टक्के परतावा दिला आहे.

टॉप-रेटेड फंडांच्या तुलनेत सर्वाधिक परतावा :
टॉप-रेटेड फंडांपैकी या म्युचुअल फंडाने 1 वर्षाच्या SIP गुंतवणुकीवर लोकांना सर्वाधिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने वार्षिक 34.13 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाचा परिपूर्ण परतावा 17.68 टक्के आहे. 2 वर्षांच्या SIP गुंतवणुकीवर या म्युचुअल फंड योजनेने सरासरी वार्षिक 31.3 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने सर्वाधिक म्हणजेच सरासरी वार्षिक 39.02 टक्के परतावा मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे, या म्युचुअल फंडाने 1, 2 आणि 3 वर्ष या कालावधीत सरासरी वार्षिक 30 टक्केपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

म्युचुअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओ :
या म्युचुअल फंड योजनेने अनेक दिग्गज कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. NTPC, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, ऑइल अँड नॅचरल गॅस, एचडीएफसी बँक, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स आणि अॅक्सिस बँक या कंपन्यांमध्ये त्यांची जास्त गुंतवणुक आहे. इक्विटीमध्ये या म्युचुअल फंडाने 94.07 टक्के गुंतवणूक केली आहे. तर या म्युचुअल फंडाने 0.86 टक्के पैसे गुंतवणूक कर्जात आणि उर्वरित 5.08 टक्के रोख आणि रोख समतुल्य भागात गुंतवले आहेत. आपण ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंडमध्ये एकरकमी 5,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. तर SIP मध्ये 100 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICICI Mutual Fund ICICI Prudential Infrastructure Fund NAV on 28 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या