16 May 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | रॉकेट तेजीत पीएसयू डिफेन्स कंपनीचा शेअर, खरेदीला ऑनलाईन गर्दी, फायदा घ्या - NSE: HAL RVNL Share Price | पीएसयू बुलेट ट्रेनच्या तेजीत, अप्पर सर्किट हिट, शेअर्स खरेदीला तुफान गर्दी - NSE: RVNL Tata Motors Share Price | तुमच्या पोर्टफोलिओत आहे हा शेअर? रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IREDA Share Price | पीएसयू शेअर्समध्ये 2.79 टक्क्यांची तेजी, मल्टिबॅगर शेअर्स खरेदी करा, अपडेट आली - NSE: IREDA CDSL Share Price | मल्टिबॅगर सीडीएसएल शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा Suzlon Share Price | 23 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, फायदा घ्या, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, यापूर्वी दिला 802% परतावा, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

Adani Power Share Price | अदानी पॉवरची बत्ती गुल होणार? स्टॉकमध्ये उतरती कळा? अदानी स्टॉक बद्दल तज्ञ काय म्हणताता?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | हिंडनबर्ग रिसर्च फर्मच्या ‘अकाउंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिपुलेशन अँड मनी लाँडरिंग’ संबंधित जाहीर रिपोर्टमुळे अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरत चालले आहेत. ‘अदानी पॉवर’ कंपनीच्या शेअरमध्ये मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून पडझड पाहायला मिळत आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनमध्ये ‘अदानी पॉवर’ कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांनी कोसळले आहेत. जबरदस्त नकारात्मक भावनांमुळे शेअरची किंमत सतत घटत चालली आहे. हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालामुळे अदानी ग्रुपच्या सर्व कंपनीने नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 181.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Power Share Price | Adani Power Stock Price | BSE 533096 | NSE ADANIPOWER)

गुंतवणुकीवर परतावा :
अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने 2022 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 200 टक्के पेक्षा जास्त अधिक परतावा मिळवला होता. 2023 या नवीन वर्षात अदानी पॉवर स्टॉक 39.06 टक्के कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 35 टक्के कमी झाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर 182.45 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीचे बाजार भांडवल कमी होऊन 70,369 कोटी रुपयांवर आले आहे. अदानी पॉवर स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करत आहे.

अदानी पॉवर स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
212 रुपये ही किंमत पातळी अदानी पॉवर स्टॉकसाठी दैनंदिन चार्टवर एक मजबूत प्रतिकार क्षेत्र निर्माण करत आहे. मागील 5 महिन्यांत स्टॉकमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. आणि गेक्या 2-3 आठवड्यांत स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आपण पाहू शकतो. तांत्रिकदृष्ट्या लोअर सर्किट्समध्ये आणखी खालीची पातळी पाहायला मिळू शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

चार्ट पॅटर्न कदाचित अनियमित असू शकतो, मात्र तरीही अदानी पॉवर स्टॉक सर्वात स्वस्त शेअर्सपैकी एक आहे. आणि स्टॉक मधील नकारात्मकता इव्हेंट आधारित आहे. गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी स्वत: च्या जोखमीनुसार निर्णय घेऊ शकतात. रेलिगेअर ब्रोकिंग फर्म चे तज्ञ म्हणतात की, स्टॉकमध्ये जोरदार विक्री झाल्यानंतर अदानी काही प्रमाणात रिकव्हरी पाहायला मिळत आहे. वातावरण स्थिर होईपर्यंत नवीन गुंतवणूक टाळणे शहाणपणाचे राहील, असे तज्ञ म्हणतात. अदानी पॉवरमध्ये ट्रेण्ड अजूनही नकारात्मक पाहायला मिळत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी नवीन गुंतवणूक करणे टाळावे.

एंजल वनचे तज्ञ म्हणतात की, “हिंडेनबर्ग फर्मच्या अदानी ग्रुपवरील अहवालात जे आरोप करण्यात आले, त्यामुळे अदानी समूहातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर कोसळले. त्यामुळे तज्ञांनी स्टॉकमध्ये सुधारणा होईपर्यंत त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अदानी पॉवर स्टॉक मंदीच्या ट्रेंडमध्ये व्यवहार करत आहे. 180 रुपये किंमतच्या जवळ स्टॉकला मजबूत सपोर्ट असून आणि 220 रुपये जवळ रेझिस्टन्स पातळी निर्माण झाली आहे. मागील काही दिवसात अदानी पॉवर स्टॉक 40 टक्के कमजोर झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price 533096 ADANIPOWER stock market live on 08 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या