
Trent Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘ट्रेंट’ या रिटेल कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.83 टक्के घसरणीसह 1330.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहेत. आणि या तिमाहीत ट्रेंट कंपनीच्या नफ्यात 21 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Trent Share Price | Trent Stock Price | BSE 500251 | NSE TRENT)
अप्रतिम तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस टाटा समूहाच्या ट्रेंट कंपनीच्या शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणुकदार आर के दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स दीर्घकाळापासून जागा बनवून आहे. बाजारात प्रचंड उलथापालथ असताना ट्रेंट कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने दिली लक्ष किंमत :
तज्ञांनी ट्रेंट कंपनीवर 1500 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने ट्रेंट कंपनीचे शेअर्स दीर्घ काळासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या वर्षभराच्या दृष्टीकोनातून शेअर्स 1,733 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात. ब्रोकरेज फर्म सिस्टेमॅटिक्स रिसर्चने ‘ट्रेंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरसाठी 1,532 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने ट्रेंट कंपनीच्या शेअर्सवर ‘ होल्ड ‘ रेटिंग देऊन 1,400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.