5 May 2024 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Realme 10 Pro 5G | रियलमी 10 प्रो 5G भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा

Realme 10 Pro 5G

Realme 10 Pro 5G | रिअलमीने आपल्या लेटेस्ट हँडसेट रियलमी 10 प्रो 5G चे कोका-कोला एडिशन लाँच केले आहे. कोका-कोला ब्रँडची भागीदारी आणि त्याच्या कलर स्कीमवर आधारित रिअलमीने हा नवा फोन रिअलमी 10 प्रो 5G लाल आणि काळ्या डिझाइनमध्ये भारतीय बाजारात सादर केला आहे. कोका-कोला ब्रँडचा प्रभाव या एडिशन फोनमध्ये यूआय ऑपरेटिंग सिस्टिम च्या पातळीवरही दिसून येत आहे. किंमतीच्या बाबतीतही थोडा फरक आहे. भारतात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सह रियलमी १० प्रो 5G ची किंमत 20,999 रुपये आहे. हा फोन रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवरून १४ फेब्रुवारी २०२३ पासून खरेदी करता येईल. याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अधिकृत रिटेल स्टोअर्सवरही खरेदीसाठी उपलब्ध असेल.

मिळणार खास फीचर्स
रियलमी 10 प्रो 5 जी फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह सुसज्ज आहे. नव्या हँडसेटचा डिस्प्ले साइज ६.७२ इंच आहे. एलसीडी डिस्प्ले असलेल्या फोनचे रिझोल्यूशन १०८० पिक्सल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. यात २४० हर्ट्झचा टच सॅम्पलिंगही आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी नवीन फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 वर आधारित रिअलमी यूआय 4.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. रियलमी 10 प्रो 5 जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. नव्या फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात चार्जिंगसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

अजून काही खास फीचर्स
कोका-कोलाच्या भागीदारीत सादर करण्यात आलेल्या लेटेस्ट फोनच्या इंटिरिअरच्या डिझाइनमध्ये या ब्रँडचा प्रभाव दिसून येतो. रियलमीच्या या नव्या फोनमध्ये खास आयकॉन, रिंगटोन आणि चार्जिंग अॅनिमेशनसह कोका-कोला बेस्ड थीम देण्यात आली आहे. फोनचा कॅमेरा खास डिझाइन करण्यात आला आहे. कॅमेरा शटर उघडल्यावर कोका-कोला सॉफ्ट ड्रिंकची बाटली उघडल्यासारखा आवाज येईल. तसेच कॅमेऱ्यात १९८० च्या दशकातील खास कोला फिल्टरही देण्यात आला आहे. रेड आणि ब्लॅक रंगांचे कॉम्बिनेशन ७० आणि ३० असल्याचे रियलमीने म्हटले आहे. फोनच्या मागील बाजूस कोका-कोलाचा प्रसिद्ध लोगो देखील स्पष्टपणे दिसत आहे. डिझाइनच्या बाबतीत फोनच्या मागील बाजूस मॅट फिनिश दिसते. स्क्रॅच आणि फिंगरप्रिंट्सच्या बाबतीत हे अधिक चांगले डिझाइन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खास डिझाइनने सुसज्ज असलेल्या या फोनची 6,000 उत्पादने विकली जाणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Realme 10 Pro 5G coca Cola Edition launched in India check details on 11 February 2023.

हॅशटॅग्स

#Realme 10 Pro+ 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x