5 May 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

My EPF Money | पगारदारांच्या EPF व्याजाची रक्कम लवकरच खात्यात जमा होतेय, हे काम आटपून घ्या अन्यथा...

My EPF Money

My EPF Money | नोकरी व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कापला जातो आणि ईपीएफओ पोर्टलवर प्रत्येकजण स्वतःचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) तयार करतो. आपल्या प्रॉव्हिडंट फंड बॅलन्सबद्दल तुम्ही यूएएनच्या माध्यमातूनच जाणून घेऊ शकता. मात्र हे अकाऊंट नेहमी अपडेट ठेवणं गरजेचं असून त्यासाठी केवायसी अपडेट करणं गरजेचं आहे.

व्याजाची रक्कम लवकरच जमा होणार
वर्षभरापासून व्याजाच्या पैशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीएफ खातेदारांना ही रक्कम लवकरच मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्याजाची रक्कम होळीपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत ईपीएफ खात्यात पाठवली जाईल. विशेष म्हणजे दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत हा पैसा येतो. परंतु यावेळी व्याज भरण्यास विक्रमी विलंब झाला आहे. जर तुम्ही ईपीएफओमध्ये योगदान देत असाल आणि तुम्ही ईपीएफमध्ये अद्याप केवायसी अपडेट केलेले नसेल तर ते घरबसल्या त्वरीत अपडेट करा. चला तर मग तुम्हाला त्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया सांगतो..

१. यूएएनद्वारे ईपीएफ पोर्टलवरील आपल्या खात्यात लॉगिन करा.
२. यानंतर ‘मॅनेज’ सेक्शनमध्ये जाऊन ‘केवायसी’वर क्लिक करा.
३. त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि अद्ययावत करावयाच्या कागदपत्रांच्या बॉक्सवर टिक करा.
४. ‘प्रलंबित केवायसी’ सेक्शनअंतर्गत ‘सेव्ह’ वर क्लिक करा.
५. अद्ययावत दस्तऐवजाची पडताळणी संबंधित माहिती विभागाकडून केली जाते.

अर्थसंकल्प 2023 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खातेदारांना मोठा दिलासा देत ईपीएफ काढण्यावरील टीडीएस कमी केला आहे. नव्या बजेट प्लॅनमध्ये ईपीएफ खात्यांवरील टीडीएस कपात ३० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ईपीएफ धारकांना सल्ला दिला आहे की ज्या खातेदारांचे पॅन खात्याशी जोडलेले नाही त्यांना आता पैसे काढताना कमी टीडीएस भरावा लागेल. सध्याच्या प्राप्तिकर कायद्यानुसार ईपीएफ खाते उघडल्यानंतर ५ वर्षांच्या आत रक्कम काढल्यास ईपीएफमधून टीडीएस कापला जातो. पण 5 वर्षापूर्वी पैसे काढल्यास 10 टक्के कपात केली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: My EPF Money update UAN KYC online budget 2023 lowers TDS rate of EPF withdrawals on 11 February 2023.

हॅशटॅग्स

#My EPF Money(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x