
Ration Card Rules | गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारच्या योजना राबविल्या जातात. रेशनकार्डच्या माध्यमातूनही केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारे गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहोचवत आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पर्यंत मोफत रेशन देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. याशिवाय जवळपास सर्वच राज्यातील शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात रेशन मिळत आहे.
मोफत धान्य मिळण्याची सुविधा
प्रत्येक राज्य सरकारच्या वतीने राज्यातील नागरिकांना शिधापत्रिका देण्यात येतात. रेशनकार्डच्या माध्यमातून लोकांना कमी किमतीत किंवा मोफत धान्य मिळू शकते. अनेकदा ते रेशन देण्यास टाळाटाळ करतात किंवा कमी रेशन देतात, असेही दिसून आले आहे. त्यामुळे गरिबांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण तुम्हालाही अशी अडचण असेल तर त्यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.
डीलरचा परवाना निलंबित होण्याची शक्यता
या हेल्पलाइन पूर्णपणे टोल फ्री आहेत. या नंबरवर रेशनशी संबंधित कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास फोन करू शकता. ही तक्रार शिधापत्रिकाधारकामार्फतच करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी केली जाईल. जर तुमचा आरोप खरा आढळला तर डीलरचा परवाना ही निलंबित केला जाऊ शकतो. प्रत्येक राज्यानुसार सरकारने वेगवेगळे टोल फ्री नंबर जारी केले आहेत. आपण आपल्या राज्यानुसार फोन करून तक्रार दाखल करू शकता.
राज्यानुसार टोल फ्री नंबर
* उत्तर प्रदेश – 18001800150
* उत्तराखंड – 18001802000, 18001804188
* पश्चिम बंगाल – 18003455505
* महाराष्ट्र – 1800224950
* पंजाब – 180030061313
* राजस्थान – 18001806127
* गुजरात – 18002335500
* मध्य प्रदेश- 07552441675, हेल्पडेस्क नंबर: 1967/ 181
* आंध्र प्रदेश – 18004252977
* अरुणाचल प्रदेश – 03602244290
* आसाम – 18003453611
* बिहार – 18003456194
* छत्तीसगड – 18002333663
* गोवा – 18002330022
* हरियाणा – 18001802087
* हिमाचल प्रदेश – 18001808026
* झारखंड – 18003456598, 1800-212-5512
* कर्नाटक – 18004259339
* केरळ – 18004251550
* मणिपूर – 18003453821
* मेघालय – 18003453670
* मिझोराम – 1860222222789, 18003453891
* नागालँड – 18003453704, 18003453705
* ओडिशा – 18003456724 / 6760
* सिक्कीम – 18003453236
* तमिळनाडू – 18004255901
* तेलंगणा – 180042500333
* त्रिपुरा – 18003453665
* दिल्ली – 1800110841
* जम्मू – 18001807106
* काश्मीर – 18001807011
* अंदमान आणि निकोबार बेट – 18003433197
* चंदीगड – 18001802068
* दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव – 18002334004
* लक्षद्वीप – 18004253186
* पुद्दुचेरी – 18004251082