Tata Power Share Price | 'अदानी पॉवर' फुस्स्स्स? टाटा पॉवर शेअर पैसा देईल? तज्ज्ञांचा सल्ला आणि टार्गेट प्राईस पहा
Tata Power Share Price | ऊर्जा क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या म्हणजे ‘अदानी पॉवर’ आणि ‘टाटा पॉवर’ या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहेत. मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 164.30 रुपयांवर क्लोज झाले होते. तर टाटा पॉवर कंपनीचा शेअर 0.36 टक्के घसरून 204.80 रुपयांवर क्लोज झाला होता. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स दिवसभरात 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 202.90 रुपयांवर ट्रेड करत होते. 20 जून 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 190 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने फेब्रुवारी 2021 रोजी आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत स्पर्श केली होती. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 298 किंमत रुपये होती. तर अदानी पॉवर शेअरची उच्चांक किंमत 432.80 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
कंपनीचे तिमाही निकाल :
टाटा पॉवर कंपनीने डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये जबरदस्त कमाई केली असून, कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 91 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. तर अदानी पॉवर कंपनीला डिसेंबर 2022 तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे, आणि कंपनीच्या नफ्यात 96 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 156.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 204.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तज्ञ काय म्हणतात? :
टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकवर तज्ञ, प्रतीक्षा करण्याचा सल्ला देत आहेत. त्याचवेळी Tips2trades चे तज्ञ टाटा पॉवर स्टॉक पुढील आठवड्यात 225-238 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. अदानी पॉवर कंपनीच्या स्टॉकबाबत रेलिगेअर ब्रोकिंगचे तज्ञ म्हणतात की, सध्या अदानी पॉवर टाळणे फायद्याचे ठरेल. Tips2trades चे तज्ञ म्हणतात की, अदानी ग्रुपमधील कंपनीच्या सर्व बातम्यांचा विचार करता अदानी पॉवर स्टॉक खरेदी करणे जोखमीचे असू शकते. मात्र पुढील काही आठवड्यात अदानी पॉवर स्टॉक 199-222 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे तज्ञ म्हणतात. हिंडनबर्ग फर्मच्या अहवालानंतर, अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये उतरती कळा लागली होती, त्याचा नकारात्मक परिणाम ‘अदानी पॉवर’ कंपनीच्या स्टॉकवरही पाहायला मिळाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share price 500400 TATAPOWER stock market live on 13 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका
- Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस?
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का?
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल