20 May 2024 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

EKI Energy Services Share Price | होय खरंच! 1 लाखावर 21 लाख परतावा देणारा शेअर 40% स्वस्त झालाय, खरेदी करणार?

EKI Energy Services Share Price

EKI Energy Services Share Price | ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीचे दिवस फिरले आहेत. ज्या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत लोकांना 2066 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला, त्या कंपनीचे शेअर्स तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के घसरणीसह 702.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 9 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 40.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | EKI Energy Services Share Price | EKI Energy Services Stock Price | BSE 543284)

कंपनीचा निराशाजनक तिमाही निकाल :
31 डिसेंबर 2022 रोजी ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीने संपलेल्या तिमाहीत 45.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तथापि कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या संबंधित तिमाहीमधील एकत्रित निव्वळ नफ्याचा आकडा जाहीर केला नाही. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 106.13 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता, आणि तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 421.12 कोटी रुपये कमाई केली होती, तर दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 461.15 कोटी रुपये होते.

1 लाखावर दिला 21 लाख परतावा :
आज या कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्के घसरण झाली असून शेअर मध्ये विक्रीचा जबरदस्त दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपयांवर 21 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2964 रुपये होती. तर शेअरची नीचांक पातळी किंमत 877.75 रुपये होती. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत लोकांचे 23.53 टक्के नुकसान केले आहे. 6 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2,964 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता शेअर वार्षिक उच्चांकावरून 70.39 टक्क्यांनी खाली आले आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनी मुख्यतः निव्वळ शून्य कार्बन भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस कंपनी पूर्वी ‘एन्किंग इंटरनॅशनल’ म्हणून ओळखली जात होती. कंपनी प्रशिक्षण, सल्लामसलत, ऊर्जा संरक्षण, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, सीडीएम आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट कार्बन फूटप्रिंट मापन आणि व्यवस्थापन आणि इतर अनेक शाश्वत सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EKI Energy Services Share Price 543284 stock market live on 14 February 2023.

हॅशटॅग्स

#EKI Energy Services Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x