4 May 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर सुसाट धावतोय, मोतीलाल ओसवाल फर्मने दिली नवीन टार्गेट प्राईस

Tata Moters Share price

Tata Motors Share Price | ‘टाटा मोटर्स’ या टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स नेहमी गुंतवणूकदारांच्या आवडत्या स्टॉक लॉस्ट सामील असतात. या कंपनीच्या प्रत्येक अपडेटवर गुंतवणुकदार आणि शेअर बाजारातील तज्ञाची नजर असते. कंपनीची तिमाही कामगिरी आणि शेअर मधील वाढ पाहून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 540 रुपये पर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)

ब्रोकरेज फर्मचे मत :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यात 540 रुपयेपर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांची वाढ पाहायला मिळेल असे तज्ञ म्हणतात. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के घसरणीसह 436.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केल्याने कामगिरीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,043 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही काळात वाहनांची जबरदस्त विक्री झाल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीला 1,451 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. या तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने 88,489 कोटी रुपये महसूल संकलित केला होता तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 72,229 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

टाटा मोटर्स कंपनीने तब्बल 7 तिमाहीनंतर नफा कमावला आहे. स्टैंडअलोन आधारावर या तिमाही कालावधीत टाटा मोटर्स कंपनीचा निव्वळ नफा दुप्पट वाढीसह 506 कोटी रुपयेवर गेला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा176 कोटी रुपये होता. टाटा मोटर्स कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला सांगितले की, मागील डिसेंबर तिमाहीत टाटा उद्योग समूहाचा भाग असलेली ब्रिटीश शाखा म्हणजेच जग्वार अँड लँड रोव्हर कंपनीचा महसूल 28 टक्क्यांच्या वाढीसह सहा अब्ज पौंड नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tata Motors Share Price 500570 TataMotors stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

Tata Moters Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x