13 May 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Xiaomi 13 Lite 5G | शाओमी 13 लाइट 5G स्मार्टफोनची माहिती लॉन्च पूर्वीच लीक, काय आहेत फीचर्स आणि किंमत

Xiaomi 13 Lite 5G smartphone

Xiaomi 13 Lite 5G | शाओमी 13 सीरिज २६ फेब्रुवारीरोजी जागतिक बाजारात लाँच होणार आहे. या सीरिजमध्ये शाओमी 13, शाओमी 13 प्रो आणि शाओमी १३ लाइट या तीन डिव्हाइसचा समावेश असेल. ऑफिशिअल लाँचिंगच्या काही दिवस आधी आता या सीरिजची लाइट व्हर्जन जर्मन रिटेलर वेबसाईटवर पाहायला मिळाली आहे. लिस्टिंगच्या माध्यमातून फोनच्या डिझाइन तसेच स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसरसह सुसज्ज असणार आहे.

शाओमी 13 लाइटची कीमत
जर्मन रिटेलर वेबसाईटवर शाओमी 13 लाइट फोनची वैशिष्ट्ये तर आहेतच, पण लिस्टिंगच्या माध्यमातून फोनची किंमतही समोर आली आहे. लिस्टिंगनुसार फोनची किंमत जवळपास 44,100 रुपये असेल. ही किंमत शाओमी 13 लाइटच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची असेल.

स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार, शाओमी 13 लाइट फोनमध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले असेल. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ असेल. तर डिस्प्लेचे रिझोल्यूशन १०८० बाय २४०० पिक्सल असेल. डिस्प्लेमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट मिळेल. याशिवाय हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसरसह सुसज्ज असेल. यापूर्वी गुगल प्ले कंसोल लिस्टिंगच्या माध्यमातून हा फोन स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसरसह धडकणार असल्याचे समोर आले होते. यासह फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळू शकते.

लिस्टिंगमध्ये फोनच्या कॅमेऱ्याचे फीचर्सही सांगण्यात आले आहेत. लिस्टिंगनुसार फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. हा फोन अँड्रॉइड १२ वर काम करेल.

फोनची बॅटरी
तसेच या फोनची बॅटरी ४५०० एमएएच ची असेल, ज्यात ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. चार्जिंगसाठी फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात येणार आहे. फोनचे डायमेंशन १५९.२ × ७२.७ × ७.२ मिमी आणि वजन १७१ ग्रॅम असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Xiaomi 13 Lite 5G smartphone details leaked on internet check details on 22 February 2023.

हॅशटॅग्स

#Xiaomi 13 Lite smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x