 
						Multibagger Stocks | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेन युद्ध, व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे, आणि जागतिक मंदीची शक्यता यामुळे मागील एका महिन्यात शेअर बाजारामध्ये जबरदस्त उलथापालथ सुरू आहे. याशिवाय अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेअर बाजारातील अस्थिरता आणखी वाढली आहे. मागील एका बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 2 टक्के कमजोर झाला आहे. तथापि या काळात असे शेअर्स आहेत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के म्हणजेच दुप्पट वाढवले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत.
झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल :
या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी बीएसई इंडेक्सवर 4.97 टक्के वाढीसह 32.53 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. एक महिन्यापूर्वी 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 10.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्सने लोकांना 175.63 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Integrated Technology :
मागील एका महिन्यात या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 175.08 टक्के परतावा मिळवून दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 47.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एक महिन्यापूर्वी म्हणजेच 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
Softrak Venture Investment :
शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 9.19 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. एक महिन्यापूर्वी 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 3.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 172.88 टक्के परतावा कमावून दिला आहे.
क्लासिक फिलामेंट्स :
या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका महिन्यात 164.15 टक्के वर गेली आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 32.81 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एक महिन्यापूर्वी 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
Eyantra Ventures :
या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 4.95 टक्क्यांच्या वाढीसह 99.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एक महिन्यापूर्वी 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 36.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या शेअर्सने लोकांना 150.55 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		