
TCS Infosys Wipro Jobs | चॅटजीपीटीसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्ममुळे जगभर मोठी चर्चा रंगली आहे. त्यात याच चॅटजीपीटीसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्ममुळे टीसीएस, विप्रो, इन्फोसिस असा मोठं मोठ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील तरुणांच्या नोकऱ्या जातील असं म्हटलं जातं आहे. मात्र यासंबंधित एक मोठं वृत्त आलं आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने चॅटजीपीटीसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चॅटजीपीटीसारख्या एआय प्लॅटफॉर्मला धोका मानण्यास आयटी दिग्गज कंपनीने नकार दिला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते हा एआय सह-कर्मचारी (को-वर्कर) म्हणून काम करतील आणि नोकऱ्या कमी करणार नाहीत असं म्हटलं आहे. टीसीएसचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी (सीएचआरओ) मिलिंद लक्कर म्हणाले की, अशा साधनांमुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल परंतु कंपन्यांचे व्यवसाय मॉडेल बदलणार नाही. टीसीएसमध्ये जवळपास 6 लाख लोक काम करतात.
एआय सहकारी म्हणून काम करतील
हे (जेनरेटिव एआय) एक सहकारी असेल. नोकरी म्हणजे उद्योग आणि ग्राहककेंद्री हे समजावून सांगताना सामान्य लोकांचा (कर्मचारी) कंपनी यापुढेही उपयोग करतील आणि मात्र हा ‘एआय’ सहकारी म्हणून या कामात उपयोगी पडेल. यामुळे तुमची नोकरी जाणार नाही, पण नोकरीच्या व्याख्या बदलतील असं देखील म्हटल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आता सहकारी (को-वर्कर) आणि नंतर?
दरम्यान, या दिग्गज कंपन्या आता सहकारी (को-वर्कर) असा उल्लेख करत असले तरी त्यामागे मोठी रणनीती असू शकते असं म्हटलं जातंय. कारण, सध्या हा विषय सुरुवातीच्या टप्य्यात आहे. कंपन्या एवढ्या लवकर या एआय’ला सहकारी (को-वर्कर) म्हणून पाहत असतील तर ती पुढे धोक्याची घंटा असल्याचं तंत्रज्ञान तज्ज्ञ सांगत आहेत. प्रोग्रेस, आउटपुट, क्वालिटी आणि रिझल्ट यांना निरीक्षणाखाली ठेऊन नंतर सहकारी (को-वर्कर) हा ‘बिनपगारी’ फुलटाईम सहकारी होऊ शकतो. त्यामुळे कंपन्यांचा प्रचंड पैसा वाचेल. त्यामुळे सध्या कंपन्या असे सोपे शब्द वापरात असल्या तरी भविष्यात मोठे निर्णय होऊ शकतात जे नोकरदारांच्या मुळावर येतील आणि प्रचंड बेरोजगारीचे कारण ठरतील.
चॅट जीपीटी म्हणजे काय?
चॅटजीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहे. सोप्या भाषेत चॅटजीपीटी हा एक प्रकारचा चॅटबॉट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅटिंग करू शकता. आपण चॅटजीपीटीला कोणतेही प्रश्न विचारू शकता. जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न विचाराल तेव्हा ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.