9 May 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Jyoti Resins Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 1 लाखावर तब्बल 11.82 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?

Jyoti Resins Share Price

Jyoti Resins Share Price | शेअर बाजारात दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास स्टॉक सूचीबद्ध कंपन्या वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, लाभांश यासारखे लाभ देत असतात. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास स्टॉक मार्केट नक्कीच संयमाचे फळ देते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह्ज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स. या स्मॉल कॅप केमिकल कंपनीच्या स्टॉकने नुकताच आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. याचा अर्थ कंपनीने आपल्या प्रत्येक 1 शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत जारी केले होते. एक दशकापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 11.82 कोटी रुपये नफा झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jyoti Resins and Adhesives Share Price | Jyoti Resins and Adhesives Stock Price | BSE 514448)

ज्योती रेझिन्स शेअर्स किमतीचा इतिहास :
‘ज्योती रेझिन्स’ कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकपैकी एक आहेत. या स्मॉल कॅप केमिकल कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 535 रुपये किमतीवरून वाढून 1281.50 रुपये प्रति शेअर किमतीवर गेले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी 140 टक्के परतावा कमावला आहे. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह्ज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 1,270.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 22.55 रुपयेवरून वाढून 1281.50 रुपये प्रति शेअर किंमत पातळीवर पोहचले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 5,600 टक्के नफा कमावला आहे. त्याचप्रमाणे हा स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉक मागील एक दशकात 3.25 रुपयेवरून वाढून 1281.50 रुपये प्रति शेअर किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 39,300 टक्के नफा कमावला आहे.

ज्योती रेझिन बोनस शेअरचा इतिहास :
bseindia.com या BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह्ज लिमिटेड’ या कंपनीने 8 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. याचा अर्थ या स्मॉल कॅप केमिकल कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत दिले आहेत. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 10 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 3.25 रुपये प्रति शेअर या दराने 30,769 शेअर्स असतील. त्यानंतर कंपनीने 2 : 1 या प्रमाणात वाटप केलेल्या बोनस शेअर्समुळे शेअरची एकूण संख्या वाढून 92,307 झाली होती.

1 लाखावर 11.82 कोटी रुपये परतावा :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ज्योती रेझिन्स’ कंपनीच्या शेअरची किंमत 1281.50 रुपयेवर बंद झाली होती. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर केमिकल स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11,82,91,420.5 म्हणजेच 11.82 कोटी रुपये झाले असते. 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले गेले नसते तर 10 वर्षांत गुंतवणूकदाराच्या 1 लाख रुपयेचे मूल्य वाढून 3,94,30,769 म्हणजेच 3.94 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jyoti Resins And Adhesives Share Price 514448 stock market live on 27 February 2023.

हॅशटॅग्स

Jyoti Resins Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x