17 May 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलची शेअर ट्रेडिंग सुरु, शेअर्समध्ये अप्पर सर्किट, एनसीएलएटीने दिला मोठा आदेश

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | ‘रिलायन्स कॅपिटल’ या कंपनीला NCLT कडून दिलासा मिळाला आहे. ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल’ ने रिझोल्यूशन प्रकरणात कर्जदारांच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीसाठी कंपनीची याचिका मान्य केली आहे. ‘रिलायन्स कॅपिटल’ ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023रोजी ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)

NCLAT ने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलचा आदेश बाजूला सारून निर्णय दिला की कमिटी ऑफ क्रेडिटर्सला उच्च बोलीचा प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. अपीलीय न्यायाधिकरणाने CoC ला आव्हान यंत्रणा सुरू ठेवण्याची आणि दोन आठवड्यांनंतर बोली आमंत्रित करण्याची परवानगी दिली आहे.

NCLAT ऑर्डर :
NCLAT ने Vistara ITCL India Ltd या प्रकरणात हा आदेश दिला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीला कर्ज देणाऱ्यांमध्ये विस्तारा देखील सामील आहे. रिलायन्स कॅपिटल या दिवाळखोर कंपनीच्या पुढील लिलावाला स्थगिती देणाऱ्या एनसीएलटीच्या आदेशाला अपील याचिकेत आव्हान देण्यात आले होते. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या बाबतीत ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ फर्मने सर्वाधिक महणजेच 8,640 कोटी रुपयांची बोली जाहीर केली होती. तथापि रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदारांच्या समितीने दुसरी आव्हान यंत्रणा सुरू करण्याचे जाहीर केले. त्यानंतर हिंदुजा समूहाची कंपनी ‘इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स’ ने रिलायन्स कॅपिटलसाठी सुधारित बोली सादर केली.

कंपनीवर 40000 कोटी रुपये लोन :
टोरेट इन्व्हेस्टमेंट्स फर्मने एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने 2 फेब्रुवारी 2023 रोजी सांगितले की, 21 डिसेंबर 2022 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीसाठी लावलेल्या बोलीवर आव्हान देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स फर्मने 9 जानेवारी 2023 रोजी नवीन याचिका दाखल करून ट्रिब्युनलला नवीन लिलावासाठी कर्जदारांच्या योजनेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. नंतर IIHL ने देखील NCLT च्या आदेशाला आव्हान देणारी नवीन याचिका दाखल केली. IIHL ने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या आदेशाविरुद्ध NCLAT म्हणजेच अपीलीय न्यायाधिकरणाकडे अपील केली. रिझोल्यूशन प्रक्रियेतून जात असलेल्या रिलायन्स कॅपिटल कंपनीवर एकूण 40,000 कोटी रुपयांचे कर्ज असून कंपनी हे कर्ज फेडण्यास सक्षम नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price 500111 RELCAPITAL stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Capital Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x