2 May 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

Delhivery Share Price | स्वस्त झालेला डेल्हीवरी कंपनीच्या शेअरची म्युच्युअल फंड हाऊसेसकडून जोरदार खरेदी, स्टॉक मोठा परतावा देणार?

Delhivery Share Price

Delhivery Share Price | तीन दिग्गज गुंतवणूक फर्मने लॉजिस्टिक कंपनी ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर मोठी बाजी लावली आहे. मॉर्गन स्टॅनली मॉरिशस कंपनी लिमिटेड, बीएनपी परिबास ऑर्बिट्रेज, सोसायटी जनरल यांनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. BSE निर्देशांकावर उपलब्ध ब्लॉक डीलच्या डेटावरून असे कळते की, सॉफ्टबँकेने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स विकले आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 339.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)

कंपनीची ब्लॉक डील :
BSE इंडेक्सवर उपलब्ध माहितीनुसार, मॉर्गन स्टॅनली मॉरिशस कंपनी लिमिटेडने ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे 792783 शेअर्स खरेदी केले आहेत. तर BNP परिबास ऑर्बिट्रोसने ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे 800000 शेअर्स खरेदी केले आहेत. सोसायटी जनरलने ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे 24,00,000 शेअर्स सरासरी 340.8 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. जपानच्या सॉफ्टबैंकने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिलिव्हरी कंपनीचे 3.8 टक्के भाग भांडवल विकले होते. सॉफ्टबँकेने ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे 954 कोटी रुपयांचे शेअर्स खुल्या बाजारात विकले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध ब्लॉक डील डेटानुसार SVF Doorbell Caymen ने 8 व्यवहारांमध्ये 2.80 कोटी शेअर्स ऑफलोड केले. हे शेअर्स सरासरी 340.8 रुपये किमतीवर विकले गेले. याचे एकूण मूल्य 954 कोटी रुपये होते. सॉफ्टबँक ही ‘डेल्हीवरी लिमिटेड’ या लॉजिस्टिक कंपनीमधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. डिसेंबर 2022 पर्यंत सॉफ्टबॅकची उपकंपनी SVF Doorbell Cayman ने ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीमध्ये 18.42 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

डिसेंबर 2022 तिमाहीची कामगिरी : तिसऱ्या तिमाहीत ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीला 195 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीला 195.7 कोटी रुपये नुकसान झाले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 127 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. लॉजिस्टिक कंपनीचा महसूल देखील डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 9 टक्के घटला असून 1823 कोटी रुपयेवर आला आहे, जो मागील वर्षीच्या याच डिसेंबर तिमाहीत 2019 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Delhivery Share Price 543529 stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#Delhivery Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x