
Imagicaaworld Entertainment Share Price | ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीचे शेअर्स बऱ्याच काळापासून तेजीत वाढत होते. मात्र आज स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनाक 9 मार्च 2023 रोजी ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीचे शेअर्स 5.28 टक्के घसरणीसह 51.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्मॉल कॅप कंपनीचा स्टॉक मागील काही महिन्यापासून जोरदार परतावा देत आहे. मागील 3 वर्षांत ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीच्या शेअरने लोकांना 1350 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Imagicaaworld Entertainment Share Price | Imagicaaworld Entertainment Stock Price | BSE 539056 | NSE IMAGICAA)
उत्पन्नात वाढ :
‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये 76.17 कोटी रुपये कमाई केली आहे. मागील तिमाहीतील 37.64 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत या तिमाहीत 102.38 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीचे बाजार भांडवल सध्या 2230.51 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 12.45 रुपये होती.
3 वर्षाचा परतावा :
‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनीचे शेअर्स 8 मे 2020 रोजी NSE इंडेक्सवर 3.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 51.10 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअरने लोकांना 1345.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 14.45 लाखांपेक्षा जास्त झाले आहे.
1 वर्षापर्यंत परतावा :
‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ पुणे मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 277.7% परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये आतापर्यंत कंपनीने 41.88 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, मागील 6 महिन्यात या स्टॉकने लोकांना 57.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 49.93 टक्के वाढली आहे. तर मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 39.33 टक्के कमावून दिला आहे.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ मनोरंजन सुविधा देणारी कंपनी आहे. ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनी थीम पार्क, वॉटर स्पोर्ट्स, स्नो वर्ल्ड, किड्स राइड्स अशा बऱ्याच करमणुकीच्या गोष्टी चालवते. ‘इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट’ कंपनी 2010 साली स्थापन करण्यात आली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.