9 May 2025 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Penny Stocks | सावध राहा! या कंपनीचे पेनी शेअर्स खरेदी करू नका, फंडामेंटल्स अस्तित्वात नाहीत

Penny Stocks

Penny Stocks | ‘साधना ब्रॉडकास्ट’ आणि ‘शार्पलाइन ब्रॉडकास्ट’ या कंपन्यांच्या स्टॉकमधील पंप अँड डंप प्रकरण समोर आल्यानंतर, सेबीने पेनी स्टॉक्सकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे. अनेक पेनी स्टॉक्स अल्पावधीत 200 ते 2000 टक्के परतावा देतात. संशोधनानुसार, एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 200 ते 2,000 टक्के परतावा देणाऱ्या 150 पेनी स्टॉक्सची ओळख करण्यात आली आहे. 100-100 पट परतावा देणार्‍या स्टॉकची यादी तर जबरदस्त मोठी आहे. हे सर्व पेनी स्टॉक अचानक वाढतात आणि अचानक पडतात. मात्र या पेनी शेअर्सचे वास्तव काय? पेनी स्टॉकचे आमिष महागात पडेल? पेनी स्टॉक ‘पंप अँड डंप’ प्रकरणाचा भाग असू शकतात का? चला तर मग जाऊन घेऊ सविस्तर.

पेनी स्टॉकचे सत्य :
जर आपण पेनी स्टॉकबद्दल आकडेवारी पाहिली तर तुम्हाला अशा अनेक कंपन्या सापडतील ज्यांच्या शेअरने अल्पावधीत बिनाकारण 100-100 पट परतावा दिला आहे. या शेअर्समध्ये अनपेक्षित आणि अचानक खरेदी पाहायला मिळते. या स्टॉकमध्ये कोणताही ट्रिगर नसतो, किंवा शेअर्सला कोणतेही मूलभूत समर्थन नसते, तरीही पेनी स्टॉकमध्ये ही खरेदी आणि वाढ पाहायला मिळते. हे पेनी स्टॉक अचानक वेगाने तेजीत येतात आणि सतत अप्पर सर्किट हीट करतात.

नोव्हेंबर 2022 पासून ‘सॉफ्टट्रॅक व्हेंचर’ कंपनीचे शेअर्स 21 पट वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरचा PE 371 वर आहे. लाख प्रयत्न करून देखील कंपनीच्या महसूल 15-20 लाखांवर जात नाही. कंपनीच्या कमाईचा कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नाही. तरी स्टॉकमध्ये इतकी वाढ झाली आहे. ‘श्रीगंगा इंडस्ट्रीज’ कंपनीच्या स्टॉकने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत लोकांना 100 पट परतावा कमावून दिला आहे. स्टॉक ज्या वेगाने वर गेला होता त्याच्या दुप्पट वेगाने आता खाली येत आहे. उणे 30 पुस्तक मूल्य असलेल्या कंपनीचे शेअर्स 65-64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कोणत्याही फंडामेंटल्स शिवाय वाढ :
‘वोहरा इंडस्ट्रीज’ या तोट्यातील कंपनीने कधी नफा तर सोडा, महसुल ही पहिला नाहीये. उने 10 पुस्तक मूल्य असलेल्या कंपनीचे शेअर्स 125 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ऑक्टोबर 2022 पासून या कंपनीच्या स्टॉकची किंमत दुप्पट झाली आहे. अशा इतर ही कंपन्या आहेत त्यात मर्करी मेटल्स, करावंती फाइनेंस, एसएनटी कॉर्प, केएनआर रेल इंजीनियरिंग, टेलरमेड रिन्यूएबल्स या सारख्या अनेक कंपन्या सामील आहेत. या कंपनीच्या शेअर्सला कोणतेही मूलभूत सपोर्ट किंवा ट्रिगर नाही, परंतु शेअरची ट्रेडिंग भन्नाट तेजीत होत आहे.

पेनी शेअर्सवर तज्ञांचे मत :
कोणत्याही तज्ञांनी शेअर्सबाबत दिलेला सल्ला क्रॉसचेक करावा. पूर्वी पेनी स्टॉकचा डेटा उपलब्ध नव्हता, पण आता सर्व ऑनलाईन उपलब्ध आहे, त्यामुळे अत्यंत सावधगिरीने गुंतवणूक केली पाहिजे. संबंधित कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन त्यांची माहिती वाढली पाहिजे. स्टॉक किती मौल्यवान आहे यासाठी पीई मल्टीपल आणि बुक व्हॅल्यू चेक केली पाहिजे. जर लोक मल्टीबॅगर रिटर्न्स पाहूनच पेनी स्टॉक्स खरेदी करणार असतील तर नफा कमावणाऱ्या कंपनीच्या स्टॉकमध्ये लोक गुंतवणूक का करतात? हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. काही कंपन्यांचा नफा हा त्यांच्या गुंतवणूकदारांच्या मासिक पगारापेक्षा ही कमी असतो, अशावेळी त्या शेअर्सची खरे मूल्य किती आहे, पाहायला शिकले पाहिजे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Pump and dump alert on 10 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या