14 May 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या 4 शेअर्समध्ये वाढ मात्र 6 शेअर्सची स्थिती कमजोर, जाणून घ्या अदानी ग्रुपच्या शेअरची कामगिरी

Adani Group Shares

Adani Group Shares | नकारात्मक जागतिक ट्रेंडमुळे शुकरवरी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. फायनान्स, आयटी आणि कॅपिटल गुड्स, शेअर्समध्ये जबरदस्त पडझड झाल्यामुळे शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी लाल निशाणीवर ट्रेड करत होते. सलग दोन दिवस शेअर बाजार कमजोर होता. याच दरम्यान अदानी समूहाच्या 4 कंपन्याचे शेअर्स अपर सर्किटवर ट्रेड करत होते. ‘अदानी पॉवर’, ‘अदानी ग्रीन’ कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. मात्र अदानी समूहाची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ चे शेअर्स दोन दिवसांत 11 टक्क्यांनी खाली घसरले होते.

SVB Financials कंपनीचे स्टॉक 60 टक्के क्रॅश झाल्यामुळे यूएस बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. म्हणून शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरला होता. अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी 4 शेअर्सनी अपर सर्किट हीट केला होता. आणि ते सर्व स्टॉक टॉप गेनर्सच्या यादीत ट्रेड करत होते.

अदानी समूहाच्या या शेअर्समध्ये उसळी :
* ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 45.20 रुपये किंवा 5.00 टक्क्यांच्या वाढीसह 949.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 32.50 रुपये म्हणजेच 5.00 टक्क्यांच्या वाढीसह 682.7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्सही 45.20 रुपये म्हणजेच 5.00 टक्क्यांच्या वाढीसह 949.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* ‘अदानी पॉवर’ कंपनीचे शेअर्स 9.00 रुपये म्हणजेच 4.59 टक्क्यांच्या वाढीसह 204.90 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते.
* ‘अदानी पोर्ट्स’ कंपनीचे शेअर्स 1.75 रुपये म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 699.00 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते.

अदानी समूहाच्या 5 शेअर्समध्ये पडझड :
* ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 58.95 रुपये म्हणजेच 3.02 टक्क्यांच्या घसरणीसह 1,894.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* ‘अदानी विल्मर’ कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 23.40 रुपये घसरणीवर 451.00 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते.
* सिमेंट कंपनी ‘एसीसी’ आणि ‘अंबुजा सिमेंट’ आणि ‘एनडीटीव्ही’ कंपनीच्या शेअरमध्येही थोडीफार पडझड झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares return on investment check details on 11 March 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x