
NALCO Share Price | शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रचंड चढ-उताराच्या दरम्यान ‘नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड’ म्हणजेच ‘नाल्को’ कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली आहे. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 82.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 0.06 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका महीन्यात या कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढले आहे. ‘नाल्को’ कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या शेअर धारकांना 11.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 32.65 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ‘नाल्को’ कंपनीचे बाजार भांडवल 14,784.89 कोटी रुपये आहे. तथापि ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उताराची शक्यता व्यक्त केली आहे. (National Aluminium Company Limited)
ॲटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अॅल्युमिनियम किंमतीचा दृष्टीकोन, व्यवसाय मॉडेल आणि लाभांश या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही ‘NALCO’ या सरकारी मालकीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहोत. ‘नाल्को’ कंपनीचे शेअर्स सध्या आकर्षक किमतीवर उपलब्ध आहेत. मजबूत स्थितीमुळे तज्ञांनी NALCO कंपनीचे शेअर 99 प्रति शेअरच्या लक्ष्य किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. उत्कल डी कॅप्टिल कोळसा खाण उपक्रम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने म्हटले आहे. तर गुजरातमध्ये कॉस्टिक सोडा प्लांट सुरू केल्याने कच्च्या मालाची सुरक्षा आणि कमी खर्चात उपलबध्दता होईल.
लाभांश वाटप :
‘नाल्को’ कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 2.5 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 22 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. नाल्को कंपनी भारतातील सर्वात स्वस्त बॉक्साईट आणि अल्युमिनयम उत्पादकांपैकी एक मानली जाते. ही कंपनी अल्युमिनियमची एक प्रमुख निर्यातदार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.