8 May 2024 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Gail India Share Price | या सरकारी कंपनीचा 104 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस चेक करा

Gail India Share Price

Gail India Share Price | सरकारी मालकीची महारत्न कंपनी ‘गेल इंडिया’ च्या शेअर्सबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्ससाठी 128 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने यापूर्वी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर 117 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती, त्यात आता वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 104.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (GAIL (India) Limited)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने म्हणजेच PNGRB ने ‘गेल इंडिया’ कंपनीच्या 9 इंटर कनेक्टेड पाइपलाइनसाठी एकात्मिक दर जाहीर केले आहेत. या पाइपलाइनचा कंपनीच्या एकूण व्हॉल्यूममध्ये सुमारे 90 टक्के वाटा आहे. PNGRB ने 58.61 रुपये / MMBtu दर जाहीर केला असून हे सध्याच्या दरापेक्षा 30 टक्के म्हणजेच 12 रुपये अधिक आहे. या पाइपलाइनसाठी सध्याचे टॅरिफ 46 रुपये / MMBtu आहे. गेल इंडिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, तेल आणि वायूच्या दरात वाढ झाल्यामुळे कंपनीचा महसूल सुमारे 1600 कोटी रुपयांनी वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीने नैसर्गिक वायू दर 68.55 / MMBtu पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे, जर ही मागणी मंजूर झाली तर कंपनीला याचा मजबूत फायदा होईल.

ब्रोकरेज फर्म ‘जेएम फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीज’ ने सांगितले आहे की, 58.61 रुपये / MMBtu हा सुधारित दर कंपनीसाठी सकारात्मक असेल. यामुळे कंपनीच्या गॅस ट्रान्समिशन सेगमेंटच्या महसुलात 20 अब्ज रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ‘जेएम फायनान्शिअल’ फर्मचे म्हणणे आहे की गेल इंडिया कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला अपेक्षा आहे की, भारत सरकार 31 मार्च 2023 पूर्वी ‘किरीट पारिख समिती’ च्या शिफारशी स्वीकारेल. ब्रोकरेज फर्मने गेल इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून 125 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर यापूर्वी अनेक तज्ञांनी गेल इंडिया कंपनीच्या शेअर्ससाठी 120 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती, ज्यात आता वाढ करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gail India Share Price BSE 532155 on 24 March 2023.

हॅशटॅग्स

GAIL India share price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x