
Fusion Micro Finance Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमी करू इच्छित असाल तर तज्ञांनी तुमच्यासाठी एक स्टॉक निवडला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 50 टक्के वाढतील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज कंपन्यांनी ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ स्टॉक 600 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल सारख्या दिग्गज फर्मने देखील ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Fusion Micro Finance Limited)
शेअरची लक्ष किंमत :
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ कंपनीच्या शेअरसाठी 600 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तर ‘जेएम फायनान्शियल’ फर्मने या स्टॉकसाठी 570 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर 4 फर्मने ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ कंपनीच्या स्टॉकसाठी 592.50 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के घसरणीसह 397.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या शेअर बाजार खूप अस्थिर आहे, अशा काळातही या स्टॉकने लोकांना 8 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 444.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 321.10 रुपये होती.
शेअरची कामगिरी :
पुढील 12 महिन्यांत ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ कंपनीची किंमत 600 रुपयांवर जाऊ शकते, असे तज्ञ म्हणतात. कमजोर बाजारातही हा स्टॉक 550 रुपयांपर्यंत वाढू शकतो. म्हणजेच सध्याच्या किंमतीपेक्षा हा स्टॉक 35 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतो. अल्पावधीत हा स्टॉक 574.50 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीमध्ये 68.18 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्यापैकी 2.36 टक्के भाग भांडवल तारण ठेवले आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे 5.32 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
‘फ्यूजन मायक्रो फायनान्स लिमिटेड’ ही कंपनी 1994 साली स्थापन झाली होती. ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. 31-12-2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 466.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यात कंपनीचा PAT 102.46 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.