8 May 2025 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NHPC Share Price | तब्बल 42 टक्के परतावा मिळेल, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, किंमत 82 रुपये - NSE: NHPC HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
x

RVNL Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने 231 टक्के परतावा दिला, आता डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या

RVNL Share Price

RVNL Share Price | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी प्रति शेअर 1.77 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 0.077 टक्के घसरणीसह 64.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Rail Vikas Nigam Limited)

कंपनीची घोषणा :
RVNL कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आज शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी प्रति इक्विटी शेअर 1.77 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे”. या लाभांश वाटपासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून गुरुवार दिनाक 6 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे, आणि अंतरिम लाभांश पेमेंट 22.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केले जाईल. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ ही सरकारी मालकीची कंपनी रेल्वे पायाभूत सुविधा विकास आणि बांधकामात क्षेत्रात व्यवसाय करते.

गुंतवणुकीवर परतावा :
RVNL कंपनीच्या शेअरने सूचीबद्ध झाल्यानंतर आपल्या गुंतवणुकदारांना 231 टक्के परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत भारत सरकारने या रेल्वे कंपनीचे 78.2 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मागील एका वर्षात या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मे 2019 मध्ये शेअर बाजारात पदार्पण केले होते. आणि हा स्टॉक सूचीबद्ध झाल्यापासून 231 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price BSE 542649 on 25 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या