17 May 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

EPFO Money in Adani Group | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा ईपीएफचा पैसा अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवला जातोय, शेअर्समध्ये घसरण

EPFO Money in Adani Group

EPFO Money in Adani Group | देशातील सर्व प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नुकतीच घसरण होऊनही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुंतवणूक सुरूच ठेवली आहे. सुमारे २७७.३ दशलक्ष भारतीयांच्या बचतीचे व्यवस्थापन करणारी ही सरकारी संस्था अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स या अदानी समूहाच्या दोन शेअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक करून नोकरांचा पैसा ओतत आहे. विशेष म्हणजे याचा नोकरदारांना काहीच फायदा होणार नसून त्याचा फायदा होईल तो अडाणी ग्रुपला. या गुंतवणुकीमुळे अदानी ग्रुपच्या बाजार भांडवलात वाढ होईल आणि त्याचा उपयोग ते अजून कर्ज उभारणीसाठी करतील असं म्हटलं जातंय. EPFO केंद्राच्या अखत्यारीत येतं असल्याने यामागे देखील मोदी सरकारच असणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. यावरून राहुल गांधी सामान्य लोकांना जागृत करत आहेत हे देखील स्पष्ट होतंय. त्यासाठीच राहुल गांधींचा आवाज संसदेपासून बंद केला जातोय हे देखील अधोरेखित होतंय.

मीडिया रिपोर्टमधून माहिती
एका मीडिया रिपोर्टमधून ही माहिती मिळाली आहे. एका अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनीचा अहवाल समोर आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. २७ मार्च रोजी ‘द हिंदू’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ईपीएफओ या दोन्ही कंपन्यांमध्ये कॅप्टिव्ह गुंतवणूकदार आहे. कारण हे दोन्ही शेअर्स निफ्टीचा भाग आहेत ज्याचा मागोवा ईपीएफओ-मॅनेज्ड फंड्सद्वारे घेतला जातो.

ईपीएफओ आपल्या निधीतील १५ टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये गुंतवते, असे अहवालात म्हटले आहे. मार्च 2022 पर्यंत कंपनीने ईटीएफमध्ये 1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये आणखी 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने जानेवारीच्या अखेरीस अदानी समूहावर शेअरच्या किमतींमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले, पण आपल्या शेअर्सची घसरण थांबवण्यासाठी काहीच केले नाही. विशेष म्हणजे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदाणी हे सिंगापोर येथून शेल कंपन्यांच्या आधारे पैसा ओततात असं देखील अनेक रिपोर्टमधून समोर आलंय.

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची दोन दिवसांची बैठक आजपासून सुरू होत आहे. या बैठकीत पगारदारांच्या पेन्शनमध्ये वाढ, आर्थिक वर्ष २०२३ साठी व्याजदर आणि वार्षिक आर्थिक अंदाज या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ईपीएफओ हा देशातील सर्वात मोठा निवृत्ती निधी आहे. अशा तऱ्हेने त्याच्या विश्वस्तांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अदानी समूहाच्या या दोन शेअर्समध्ये ईपीएफओ गुंतवणूक करत राहील, असे ‘द हिंदू’ने म्हटले आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर तज्ज्ञांनी ईपीएफओच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी केली होती. दीर्घ मुदतीत चांगला परतावा देण्यासाठी गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची सूचनाही काहींनी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EPFO Money in Adani Group check details on 27 March 2023.

हॅशटॅग्स

#EPFO Money in Adani Group(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x