
Adani Group Shares | दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणखी एक मोठा आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काल म्हणजे मंगळवारी, 28 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की अदानी समूहात गुंतवलेले सर्व पैसे पंतप्रधान मोदींचे आहेत. भाजपमधील एका मोठ्या नेत्याने स्वतः मला या गंभीर विषयाची माहिती दिली आहे. भाजपने ७ वर्षांत देशाची प्रचंड लूट केली आहे. तोच पैसा नरेंद्र मोदी अदानी समूहात गुंतवत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी दिल्ली विधानसभेत केला आहे.
विधानसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ज्या दिवशी अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले. त्याच दिवशी खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. कारण त्यांना देशातील नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचे आहे. केजरीवाल म्हणाले की, अदानी समूहातील संपूर्ण पैसा पंतप्रधान मोदींकडून गुंतवला जातो.
अदानींना श्रीलंकेचा प्रकल्प
पंतप्रधानांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांची भेट घेतली आणि अदानी यांना जबरदस्तीने विंड प्रोजेक्ट मिळवून दिला. त्यांनी हा प्रकल्प अदानींना दिला नाही, तर स्वत: कडे घेतला. आपल्या देशात जशी संसदेची स्थायी समिती आहे, तशीच तिथल्या एका समितीने आपल्या वीज मंडळाच्या अध्यक्षांना बोलावून हा प्रकल्प अदानींना का दिला, अशी विचारणा केली. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी आपल्याला फोन केला होता आणि हा प्रकल्प अदानींना देण्यात यावा, यासाठी पंतप्रधान मोदींचा खूप दबाव होता, असे त्यांनी समितीला सांगितले होते याची देखील त्यांनी विधानसभेत आठवण करून दिली.
सर्व महागडे इस्रायली संरक्षण करारही प्राप्त झाले
बांगलादेशला २५ वर्षे १५०० मेगावॅट वीज खरेदी करावी लागली. त्यांनी हा प्रकल्प (पंतप्रधान) अदानी यांनाही दिला. इस्रायलला गेल्यावर त्यांनी सर्व संरक्षण सौदे अदानी यांच्याकडे सोपवले. दोन-तीन वर्षांपूर्वी सहा विमानतळांचा लिलाव झाला होता. यापूर्वी विमानतळाचे काम करणाऱ्या व्यक्तीला कंत्राट देण्यात येईल, अशी अट होती. पण अखेरच्या क्षणी ही अट काढून सर्व 6 विमानतळ अदानींना देण्यात आली. कारण याचा थेट संबंध नरेंद्र मोदी यांच्याशी होता.
अनेकांच्या कंपन्या काबीज केल्या
मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले की, तपास यंत्रणांचा वापर करून अनेकांच्या कंपन्या काबीज केले जात आहेत. आधी कृष्णापट्टणम बंदरावर छापा टाकण्यात आला आणि काही वर्षांनी ती अदानीने विकत घेतला. त्याचप्रमाणे एसीसी आणि अंबुजा सिमेंटवर छापे टाकून नंतर अदानीने खरेदी केले. मुंबई विमानतळ पूर्वी जीव्हीके कंपनी समूहामार्फत चालवले जात होते. येथेही छापे टाकण्यात आले आणि विमानतळ अदानीकडे गेले. कंपनी मालकांना एकतर तुरुंगात जा किंवा तुमचा व्यवसाय आमच्या ताब्यात द्या, अशी धमकी दिली जात आहे. असं थेट पाढाच त्यांनी वाचला.
फक्त सात वर्षांत लुटण्याचा विक्रम मोडला
ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ऑर्डर देण्यात आली होती. सर्व वीज प्रकल्पांना १० टक्के कोळसा आयात करावा लागेल आणि कारण तो आयात अदानी करतात. तो कोळसा आपल्या देशातील कोळशापेक्षा दहापट महाग आहे. ६७ वर्षांत भारतातील सर्व सरकारांनी मिळून ५५ लाख कोटींचे कर्ज घेतले. परंतु २०१४ ते २०२२ या सात वर्षांत ८५ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. हे 7 वर्षात घेतले गेले, म्हणजे मागील 67 वर्षांत घेतलेल्या पेक्षा दुप्पट.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.