
Sotac Pharmaceuticals IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. 28 मार्च 2023 रोजी ‘सोटॅक फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये 2 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. IPO मध्ये कंपनी आपले शेअर्स खुल्या बाजारात विकून भांडवल उभारणी करते. (Sotac Pharmaceuticals Limited)
‘सोटॅक फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ GMP :
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, ‘सोटॅक फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. काल 28 मार्च 2023 रोजी ग्रे मार्केटमध्ये हा IPO स्टॉक 7 रुपये प्रीमियम किंमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच गुंतवणूक करणाऱ्या लोकांना स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर 6 टक्के नफा मिळू शकतो.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
‘सोटॅक फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ ही कंपनी SOTAC ग्रुपचा एक भाग आहे. ‘सोटॅक फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ ही भारतातील अग्रगण्य औषध उत्पादक कंपनी मानली जाते. ‘सोटॅक फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ कंपनी फार्मास्युटिकल उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन आणि पुरवठा करते. ही कंपनी मोठ्या संख्येने औषध व्यावसायिकांना परवडणाऱ्या किमतीत चांगल्या दर्जाची उत्पादने पुरवण्याचे काम करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.