18 May 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Stocks To Buy | मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी तयार केलेली स्टॉक लिस्ट पाहा, अल्पावधीत 42 टक्के परतावा मिळू शकतो

Stocks To Buy

Stocks To Buy | 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारात कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांची सतत विक्री, बिघडत चाललेली जागतिक आर्थिक परिस्थिती, आर्थिक मंदीचे संकट यासह अनेक कारणांमुळे शेअर बाजार कमजोर झाला आहे. तथापि ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, या अस्थिर बाजारामध्ये काही शेअर्स ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के ते 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ज्ञांच्या मते स्टेट बँक ऑफ इंडिया, गेल इंडिया, कोल इंडिया, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, क्राफ्ट्समन ऑटोमेशन, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने सांगितले आहे की, एसबीआय बँकेच्या शेअरचा मार्जिन आउटलुक सकारात्मक दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या जागतिक अस्थिरतेचा भारतीय बँकांवर, विशेषत : एसबीआयवर कोणताही परिणाम होणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, SBI बँकेचे शेअर्स पुढील काळात 725 रुपये लक्ष्य किंमत स्पर्श करेल. सध्याच्या बाजारभावापेक्षा हा स्टॉक 42.12 टक्के परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के वाढीसह 517.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गेल इंडिया :
ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे की, GAIL इंडिया कंपनीने 58.6 रुपये प्रति एमएमबीटीयू शुल्क वाढ केली आहे. यामुळे GAIL इंडिया कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट आर्थिक वर्ष 2024 मध्ये 134 अब्ज रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट आत्तापर्यंत 116 अब्ज रुपये होता. यासोबतच मोतीलाल ओसवाल फर्मने 147.00 रुपये लक्ष्य किंमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 41.48 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 106.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कोल इंडिया :
ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे की, मजबूत देशांतर्गत मागणी, 1 अब्ज टन उत्पादनाचे उद्दिष्ट, उच्च ई लिलाव प्रीमियम यामुळे पुढील काळात कोल इंडिया कंपनीची कामगिरी मजबूत राहणार आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 275.00 रुपये पर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. हा स्टॉक पुढील काळात सध्याच्या किमतीपेक्षा 31.96 टक्के परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के वाढीसह 211.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक :
ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे की, ही बँक आपल्या कर्ज बुकमध्ये विविधता आणून व्यापार वाढीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. इक्विटास स्मॉल फायनान्सने आपले सर्व लक्ष मुख्यतः व्हेईकल फायनान्स, MFI आणि हाऊसिंग फायनान्सवर केंद्रित केले आहे. आर्थिक वर्ष 2023-25 या कालावधीत हा बँकिंग स्टॉक 26 टक्के CAGR परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.36 टक्के वाढीसह 67.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन :
या कंपनीने नुकताच वाहन कंपन्यांसाठी अॅल्युमिनियम सिलिंडर हेड बनवणारी DR Axion कंपनी 375 कोटी रुपयेला खरेदी केली आहे. ब्रोकरेज फर्म म्हणते की कंपनीला हा सौदा खूप स्वस्तात मिळाला आहे. याचा फायदा कंपनीला व्यापार वाढीसाठी होणार आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या स्टॉकवर 3925 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. पुढील काळात हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 30.34 टक्के अधिक वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.77 टक्के वाढीसह 3,154.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for short term investment on 29 March 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x