4 May 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
x

Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या हा मल्टिबॅगर शेअर 47 टक्के स्वस्त झालाय, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा

Tata Elxsi Share Price

Tata Elxsi Share Price | ‘टाटा एलेक्सी’ या टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून तेजी पाहायला मिळत आहे. सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर हा स्टॉक किंचित सावरला असून त्यात आता हळूहळू का असेना, पण सुधारणा होत आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 5,993.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tata Elxsi Limited)

स्टॉकमध्ये सुधारणा :
‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरने 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून सुधारणा दर्शवली आहे. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 10,760.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून हा स्टॉक 44.68 टक्क्यांनी कमजोर झाला होता. मागील वर्षी 17 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता शेअर बाजारातील तज्ञांनी ‘टाटा एलेक्सी’ स्टॉकबाबत तेजी व्यक्त केली आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
शेअर इंडिया फर्मचे तज्ञ आपल्या अहवालात म्हणाले की, बेंचमार्क निर्देशांकातील रिकव्हरीमुळे शेअरच्या किमतीमध्ये करेक्शन पाहायला मिळत आहे. पुढील काळात हा स्टॉक असाच वाढत राहिला तर तो अल्पावधीत 6,050 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. GCL फर्मचे तज्ञ म्हणाले की, ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे तिमाही निकाल चांगले आहेत परंतु स्टॉकचे P/E प्रमाण खूप जास्त आहे. याचा अर्थ स्टॉक सध्या खूप महाग झाला आहे. या सर्व बाबीचा विचार करून तज्ञांनी या स्टॉकवर 7,500 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. Tips2trades फर्म तज्ञ म्हणाले की, ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स नजीकच्या काळात 6,190 ते 6,400 रुपयेपर्यंत वाढू शकतात.

‘टाटा एलक्सी’ आणि ‘आल्प्स आल्पाइन’ या दोन्ही कंपन्यांनी तिरुअनंतपुरम येथील त्यांच्या कॅम्पसमध्ये जागतिक अभियांत्रिकी केंद्र सुरू करण्यासाठी सामंज्यस्य करार केला आहे. डिसेंबर 2022 या तिमाहीत ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 28.97 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 194.68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 150.95 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Elxsi Share Price on 31 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Elxsi Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x