 
						Varanium Cloud IPO | IPO ही गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची एक सुवर्ण संधी असते. स्मार्ट गुंतवणूकदार एसएमई सेगमेंटमधील IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस पैसा कमावतात. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये असे अनेक SME IPO लाँच करण्यात आले होते ज्यांतून गुंतवणूकदारांनी 500 टक्केपर्यंत परतावा कमावला आहे. आज या लेखात आपण ज्या IPO बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, ‘व्हॅरेनियम क्लाउड’. या कंपनीचा IPO मागील वर्षी 27 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीच्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 112 रुपये होती. (Varanium Cloud Limited)
गुंतवणुकीवर परतावा :
‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीच्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 112 रुपये प्रति शेअर होती. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर 4.96 टक्के घसरणीसह 681.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदाराने या IPO स्टॉकमध्ये इश्यू किमतीवर गुंतवणूक केली होती, त्यांना आतापर्यंत 500 टक्के पेक्षा जास्त नफा मिळाला आहे. नुकताच ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देखील दिला आहे. 16 जानेवारी 2023 रोजी ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीचे शेअर्स 1.602.40 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. स्टॉक लिस्ट झाल्यानंतर शेअरची किंमत अवघ्या चार महिन्यांत 1213.11 टक्के वाढली. ‘हेम सिक्युरिटीज’ फर्मच्या मते, मजबूत बॅलन्स शीटमुळे या SME कंपनीच्या IPO स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात सूचीबद्ध कंपन्यांपैकी 15 टक्के कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर्स स्टॉक सिद्ध झाले आहेत.
कंपनीचे स्पष्टीकरण :
‘व्हॅरेनियम क्लाउड’ ही कंपनी मुख्याः डिजिटल ऑडिओ, व्हिडिओ, आर्थिक ब्लॉकचेन, या संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. ‘व्हॅरेनियम क्लाउड’ ही कंपनीने 2017 पासून व्यवसायाला सुरुवात केली होती. 2020-21 मध्ये कंपनीने 289.25 लाख रुपये महसूल संकलित केला होता. 2021-22 मध्ये कंपनीचा महसुल वाढून 3535.21 लाख रुपयेवर पोहचला होता. ‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीचे बाजार भांडवल 72,506.02 लाख रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		