 
						Poonawalla Fincorp Share Price | ‘पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी ‘पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.16 लाख रुपये झाले असते. ‘पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड’ कंपनीने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1617 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के वाढीसह 292.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Poonawalla Fincorp Limited)
सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह क्लोज झाले होते. सलग तीन दिवसांच्या अप्पर सर्किटनंतर शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली होती. आज हा स्टॉक पुन्हा हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 22,351 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरूवातीपासून आतपर्यंत या स्टॉकने लोकांना 5.56 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे.
तांत्रिक चार्टवर शेअरची ट्रेडिंग :
‘पूनावाला फिनकॉर्प’ शेअर्सचा बीटा 1.5 आहे, जो एका वर्षातील उच्च अस्थिरता दर्शवतो. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकानी 62.05 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि सार्वजनिक शेअर धारकांनी या कंपनीचे 37.95 टक्के भाग भांडवल धारण केले होते. त्यापैकी किरकोळ शेअर धारकांकडे एकूण 8.67 कोटी शेअर्स किंवा 11.33 टक्के भाग भांडवल होते. तर डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीपर्यंत 7.14 टक्के भाग भांडवल ज्याचे मूल्य 2 लाखापेक्षा जास्त आहे, असे शेअर्स 87 भागधारकांनी धारण केले आहे. डिसेंबर 2022 तिमाहीपर्यंत दहा म्युच्युअल फंड हाऊसने 3.02 कोटी शेअर्स म्हणजेच 3.95 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
पूनावाला फिनकॉर्प कंपनी मागील तीन वर्षांत परताव्याच्या बाबतीत आपल्या स्पर्धक कंपन्यांना बरेच लांब सोडले आहे. मागील तीन वर्षांत M&M फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 66.47 टक्के वाढले होते, आणि सुंदरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 103 टक्के वाढले होते. या कालावधीत मॅक्स फायनान्शिअल कंपनीच्या शेअरने 89.29 टक्के परतावा दिला आहे.
कंपनीची आर्थिक बाजू मजबूत आहे, याचा अंदाज आपण कंपनीच्या ताळेबंदवरून घेऊ शकतो. डिसेंबर 2022 तिमाहीत पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 89.12 टक्के वाढ नोंदवली गेली होती. या काळात कंपनीने 182.44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 96.47 कोटी रुपये होते. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीची विक्री 37.37 टक्के वाढून 697.77 कोटी रुपयेवर पोहचली होती. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीची विक्री 507.96 कोटी रुपये नोंदवली गेली होती. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेटिंग नफा 47.30 टक्के वाढीसह 477.27 कोटी रुपयेवर गेला होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत फक्त 324.01 कोटी रुपये होता. पूनावाला फिनकॉर्प ही एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी असून आपल्या ग्राहकांना प्रामुख्याने वित्तपुरवठा करण्याचे काम करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		