 
						Atul Auto Share Price | मागील एका वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. यामध्ये ‘अतुल ऑटो’ कंपनीच्या शेअर्सचाही समावेश होतो. मागील एका वर्षोत ‘अतुल ऑटो’ या विजय केडिया यांच्या मालकीचा स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 199 रुपयेवरून वाढून 406 रुपये प्रति शेअर किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 104 टक्के परतावा कमावला आहे. अतुल ऑटो कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 406.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Atul Auto Limited)
‘अतुल ऑटो’ शेअर किमतीचा इतिहास :
अतुल ऑटो कंपनीच्या शेअरचा मागोवा घेणाऱ्या शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ‘अतुल ऑटो’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत व्हॉल्यूमसह ब्रेक आऊट पाहायला मिळत आहे. एकूण स्टॉकचा चार्ट स्ट्रक्चर आकर्षक दिसत आहे. शेअरचा मूव्हिंग अॅव्हरेज देखील पॉझिटिव्ह आहे. शेअरची सपोर्ट लेव्हल 370 रुपये किंमत पातळीवर आहे. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स आहेत, ते लोक या स्तरावर ट्रेलिंग स्टॉप लॉस सेत करु शकतात.
विजय केडिया पोर्टफोलिओ :
अतुल ऑटो कंपनी ईव्ही आणि सीएनजी विभागांमध्ये आपला आपली उपस्थिती वाढवत आहे. स्टॉकचा दृष्टीकोन आशादायक दिसत आहे. तसेच कंपनीने आपली पत पातळीही वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनी परदेशातील बाजारपेठांमध्येही आपली उपस्थिती निर्माण करत आहे. आणि कंपनीने आपल्या वितरण वाहिन्यांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. पुढील काळात हा स्टॉक 450 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो असे तज्ञांना वाटते. एंजल वनचे तज्ञ म्हणतात की, अतुल ऑटो कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत या आठवड्यात तेजी आली होती. ऑटो क्षेत्रासह वित्त क्षेत्रातही ही तेजी पाहायला मिळत आहे.
विजय केडिया यांची शेअरहोल्डिंग :
मार्च 2023 मध्ये जाहीर डेटानुसार अतुल ऑटो कंपनीमध्ये विजय केडिया यांनी 16,83,502 शेअर्स म्हणजेच 7.05 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. यासोबत त्यांची कंपनी ‘केडिया सिक्युरिटीज’ ने अतुल ऑटो कंपनीचे 3,21,512 शेअर्स म्हणजेच 1.35 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		