16 May 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Tinna Rubber & Infrastructure Share Price | कडक कमाई! 1 लाखावर 6 लाख परतावा मिळला, दिग्गज गुंतवणूकदारांकडून या शेअरची खरेदी

Tinna Rubber & Infrastructure Share Price

Tinna Rubber & Infrastructure Share Price |शेअर बाजारतील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी पुन्हा एकदा ‘तिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठी प्रॉफिट बुकींग केली आहे. ‘डॉली खन्ना’ यांनी जानेवारी-मार्च 2023 दरम्यान ‘तिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ कंपनीचे 17,000 हून अधिक इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. केमिकल क्षेत्रात व्यापार करणाऱ्या या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 488 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. (Tinna Rubber & Infrastructure Limited)

डॉली खन्ना यांची प्रॉफिट बुकींग :
मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार ‘डॉली खन्ना’ यांनी ‘तिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीमधील आपली हिस्सेदारी 0.21 टक्क्यांनी कमी केली असून 1.41 टक्के म्हणजेच 1,20,520 इक्विटी शेअर्सवर आणली आहे. यापूर्वी, डिसेंबर 2022 च्या तिमाहीत त्यांची कंपनीमधील शेअर होल्डिंग 1.62 टक्के म्हणजेच 1,38,424 शेअर्स होती. यावरून कळते की त्यांनी मागील तिमाहीत 17,904 इक्विटी शेअर्स विकून प्रॉफिट बुक केला आहे. ‘टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक सिद्ध झाले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 501.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.39 टक्के घसरणीसह 421.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

5 वर्षात 1 लाखावर 6 लाख परतावा :
मागील 5 वर्षात ‘तिन्ना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर, कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 501.43 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही या मल्टीबॅगरमध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.88 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. या दरम्यान शेअरची किंमत 74.80 रुपयेवरून वाढून 440.40 रुपयेवर पोहचली आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार, डॉली खन्नाची तिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीमध्ये 5.3 कोटी रुपयेची गुंतवणूक होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 381.22 कोटी आहे.

‘डॉली खन्ना’ पोर्टफोलओ :
डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 15 कंपनीच्या शेअर आहेत. कॉर्पोरेट शेअरहोल्डिंग फाइलिंगनुसार, सध्या त्याच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य 238.7 कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये उत्पादन, कापड, रसायने आणि साखर या क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आहेत. शेअर बाजारातील अनेक गुंतवणुकदार डॉली खन्ना यांचा पोर्टफोलिओ फॉलो करत असतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tinna Rubber & Infrastructure Share Price on 10 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x