20 May 2024 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Bank of Maharashtra Special Schemes | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कमी दिवसांच्या FD व्याजदरात बदल, अधिक फायदा

Bank of Maharashtra Special Schemes

Bank of Maharashtra Special Schemes | आजही सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर उत्पन्नासाठी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणे ही बहुतेकांची पहिली पसंती असते. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

नवीन २०० दिवसांची एफडी लाँच
व्याजदरात झालेल्या या वाढीनंतर बँक 7 दिवसांपासून 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 2.75% ते 5.75% व्याज देत आहे. त्याचबरोबर बँकेने नवीन २०० दिवसांची एफडी लाँच केली आहे जिथे ग्राहकांना जास्तीत जास्त ७% व्याज मिळत आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वाढीव नवे व्याजदर नुकतेच लागू झाले आहेत. त्यामुळे अनेक सामान्य ग्राहक बँकेत धाव घेत आहेत.

बँकेचे एफडीचे वाढलेले दर
* बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना 7 दिवस ते 30 दिवसांच्या एफडीवर 2.75 टक्के
* 31 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के
* 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के
* 91 दिवस ते 119 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज देणार आहे.
* बँक १३० दिवस ते १८० दिवसांच्या एफडीवर ४.७५ टक्के
* १८१ दिवस ते २७० दिवसांच्या एफडीवर ५.२५ टक्के
* २७१ दिवस ते ३६४ दिवसांच्या एफडीवर ५.५० टक्के
* ३६५ दिवस ते १ वर्षाच्या एफडीवर ६.१५ टक्के
* १ वर्ष ते ६ वर्षे आणि त्यावरील एफडीवर ५.७५ टक्के व्याज देणार आहे.

या कालावधीच्या एफडीवर मिळणार सर्वाधिक व्याज
बँक ऑफ महाराष्ट्रने २०० दिवसांच्या कालावधीची नवीन एफडी सुरू केली आहे, ज्यात ग्राहकांना जास्तीत जास्त ७% व्याज मिळेल. दुसरीकडे, बँक आपल्या 400 दिवसांच्या (महा धनवर्ष) योजनेवर 6.75% व्याज देईल. बँक आपल्या निवासी ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 91 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या सर्व एफडीवर अतिरिक्त 0.50% व्याज देईल. बँकेतील ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर ९१ दिवसांपेक्षा जास्त एफडीवर व्याज मिळणार आहे.

Bank of Maharashtra Special Schemes

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bank of Maharashtra Special Schemes Interest Rates check details on 11 April 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra Interest Rates(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x