19 May 2024 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Pidilite Industries Share Price | पिडीलाइट इंडस्ट्रीजचा शेअर 90 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या

Pidilite Industries Share Price

Pidilite Industries Share Price | ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ या फेविकॉल आणि फेविक्विक बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकबाबत दिग्गज तज्ञ उत्साही आहेत. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 4500 रुपये पर्यंत वाढू शकतात असे तज्ञ म्हणाले. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 0.092 टक्के वाढीसह 2,349.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Pidilite Industries Limited)

आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तज्ञांनी 2635 रुपये ही लक्ष्य किमत निश्चित केली आहे. शेअर बाजारातील 20 पैकी 12 तज्ञांनी ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजाराच्या तेजीमध्ये हा स्टॉक पुढील 12 महिन्यात 2.387.40 ते 2855 पर्यंत वाढू शकतो. तर मंदीच्या काळात हा स्टॉक 2000 रुपयेपर्यंत घसरणीचा अंदाज आहे.

डिसेंबर 2022 तिमाहीपर्यंत कंपनीमध्ये प्रवर्तकांची शेअर होल्डिंग 69.94 टक्के होती. 11.08 टक्के भाग भांडवल परकीय गुंतवणूकदारांनी धारण केले होते 4.08 टक्के भाग भांडवल किरकोळ गुंतवणूकदारांनी धारण केले होते. मागील पाच वर्षात ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 121.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 0.61 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 10.30 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 2.07 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक आणि नीचांक पातळी किंमत अनुक्रमे 2,918.95 रुपये, आणि 1,988.55 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pidilite Industries Share Price on 13 April 2023.

हॅशटॅग्स

#Pidilite Industries Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x