
Control Print Share Price Today | भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 तिमाहीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये आधीच सामील असलेल्या, IT हार्डवेअर क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘कंट्रोल प्रिंट लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. डॉली खन्ना यांनी जानेवारी-मार्च 2023 दरम्यान ‘कंट्रोल प्रिंट’ कंपनीचे 0.02 टक्के इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. (Control Print Limited)
या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. डॉली खन्ना लोकांमध्ये जास्त चर्चा नसलेले शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडत असतात. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या उत्पादन, कापड, रसायने आणि साखर क्षेत्रातील अनेक शेअर्स सामील आहेत.
वाढीव गुंतवणुक :
मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांनी ‘कंट्रोल प्रिंट लिमिटेड’ कंपनीमध्ये 1.04 टक्के म्हणजेच 1,70,207 इक्विटी शेअर्स होल्ड केले आहेत. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत त्यांच्याकडे या कंपनीचे 1.02 टक्के म्हणजेच 1,66,207 इक्विटी शेअर्स होते. अशा प्रकारे, डॉली खन्ना यांनी मार्च 2023 तिमाहीमध्ये 0.02 टक्के म्हणजेच जवळपास 4000 अधिकचे इक्विटी शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात ‘कंट्रोल प्रिंट लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 245.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
तर आज सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 572.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 2 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.30 लाख रुपये झाले असते. या कंपनीचे मार्केट कॅप 888 कोटी रुपये आहेत.
डॉली खन्ना पोर्टफोलिओ :
मार्च 2023 पर्यंतच्या शेअर होल्डींग डेटानुसार, डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 15 विविध कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये विशेषतः उत्पादन, कापड, रसायने आणि साखर कंपन्यांचे शेअर्स आहेत. डॉली खन्नाच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य 246.9 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याचा अंदाज आहे. अनेक गुंतवणुकदार डॉली खन्ना यांचा पोर्टफोलिओ फॉलो करतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.