15 May 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | स्वस्त झालेला डिफेन्स शेअर खरेदी करून ठेवा, संयम राखल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: BEL Tata Technologies Share Price | हळू-हळू तेजी पकडतोय हा शेअर, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | CLSA फर्मला विश्वास, टाटा मोटर्स शेअर्स रेटिंग आणि टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, स्टॉक खरेदी करावा का? तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: YESBANK Railway Waiting Ticket | वेटिंग तिकीट रेल्वे प्रवाशांनो, नवीन नियम लागू, ट्रेनमध्ये सीट विसरावी लागेल, अपडेट लक्षात घ्या ITR Filing 2025 | नोकरदारांनो, ITR फाइल करताना या चुका टाळा, अन्यथा मोठा त्रास होऊन आर्थिक नुकसान होईल
x

Mukesh Ambani's Right Hand | रिलायन्स ग्रुपमध्येच नोकरीला पण पगार मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक, कोण आहे ही व्यक्ती?

Mukesh Ambani and Nikhil Meswani

Mukesh Ambani’s Right Hand | रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये निखिल मेसवानी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पगार घेतात. 2021-22 या आर्थिक वर्षात निखिल मेसवानी यांना 24 कोटी रुपये पगार मिळाला होता. तर मुकेश अंबानी यांना या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपये पगार मिळाला. निखिल मेसवानी हे मुकेश अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स या क्रिकेट फ्रँचायझीचे काम सांभाळतात. याशिवाय ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर आहेत.

निखिल मेसवानी यांचे मोठे बंधू हितल मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालक आहेत. निखिल मेसवानी यांचे वडील रसिक लाल मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक होते. मेसवानी कुटुंब हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वाढीच्या कथेतील एक महत्त्वाचा भाग मानले जाते. मुकेश अंबानी यांचाही या दोन्ही भावांवर खूप विश्वास आहे.

निखिल मेसवानी यांनी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण लवकरच ते रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी पदावर पोहोचले. कंपनीच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. जामनगर रिफायनरीबरोबरच समूहाच्या किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायातही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशमध्ये झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये निखिल मेसवानी यांनी कंपनीच्या भविष्यातील योजनेविषयीही भाषण केले होते. या सर्व गोष्टींचा अंदाज मेसवानी यांच्या भूमिकेवरून लावता येतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mukesh Ambani and Nikhil Meswani Salary check details on 25 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nikhil Meswani(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या